
AUS vs ENG TEST, 1st Day: Marnus Labuschagne's big feat! The first player in the world to achieve such a feat in a day-night Test
Marnus Labuschagne creates history in Test cricket : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेमधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जात आहे. हा सामना डे-नाईट टेस्ट म्हणून खेळला जात असून ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने डे-नाईट टेस्ट क्रिकेटमध्ये एक मोठा टप्प्याला गवसणी घातली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
मार्नस लाबुशेनने फक्त १६ डावांमध्ये की किमया साधली आहे. लाबुशेनने डे-नाईट टेस्टमध्ये चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. २०१९ पासूनच्या सहा वर्षांत, डे-नाईट टेस्टमध्ये त्याची सरासरी ६६ पेक्षा जास्त राहिली आहे.
मार्नस लाबुशेनने डे-नाईट टेस्टमध्ये ६७ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे २५ वे अर्धशतक ठरले असून दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये लाबुशेनने ६५ धावांची खेळी केली. या डावात लाबुशेनने ७८ चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने आणि ९ चौकार आणि १ षटकार लागवला. ऑस्ट्रेलियाला १९६ धावांवर तिसरा धक्का बसला आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद २५६ धावा झाल्या असून इंग्लंडपेक्षा ७८ धावांनी मागे आहे.
दसुऱ्य या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला भोपळाही न फोडता माघारी पाठवले. त्यानंतर आलेला ऑली पोपला देखील तिसऱ्या षटकात शून्यावर माघारी पाठवले. ३ षटकात ५ धावांवर इंग्लंडच्या २ विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर आलेला जो रूट आणि सलामीवीर झॅक क्रॉली या जोडीने ११७ धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सांभाळला. झॅक क्रॉली ९३ चेंडूत ७६ धावा करून माघारी परतला.
एका बाजूने जो रूटने बाजू लावून धरली होती. परंतु, दुसऱ्या बाजूने इंग्लंडच्या विकेट जात होत्या. हॅरी ब्रूक ३१ धावा, कर्णधार बेन स्टोक्स १९ धावा, जेमी स्मिथ ० धावा, विल जॅक्स १९ धावा, ब्रायडन कार्स ० धावा, गस अॅटकिन्सन ४ धावा करून बाद झाले तर जो रूटने या दरम्यान शानदार शतक ठोकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रूट १३५ धावांवर तर जोफ्रा आर्चर ३२ धावांवर नाबाद होते.
हेही वाचा : IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात Temba Bavuma रचणार इतिहास! १३ धावा करताच करेल मोठा कारनामा
दुसऱ्या दिवशी आर्चर ३६ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले. तर रूटने २०६ चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या डावात १५ चौकार आणि एक षटकार मारला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी मिचेल स्टार्कने आपला पहिल्या अकसोटीतील फॉर्म कायम राखत ६ विकेट्स घेतल्या. तर मायकेल नेसर, स्कॉट बोलँड आणि ब्रेंडन डॉगेट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.