टेम्बा बावुमा(फोटो-सोशल मीडिया)
Temba Bavuma to create history in third ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळून झाले असून दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना शनिवार, ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-एडीसीए मैदानावर खेळवण्यात येणार आहे. शेवटचा सामना खूप मनोरंजक होणीयकी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा या सामन्यात एक महत्त्वाचा विक्रम रचू शकतो.
हेही वाचा : IPL 2026 Auction : ऑक्शनच्या आधी बीसीसीआयने बदलले नियम, परदेशी खेळाडूंच्या खिशाला बसणार फटका
टेम्बा बावुमाला या सामन्यात २००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याची संधी आहे. भारत दौऱ्यावर यशाची नवी कहाणी लिहिणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २००० धावांचा टप्पा गाठू शकतो. हा टप्पा गाठण्यासाठी बावुमाला आता फक्त १३ धावांची आवश्यकता आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बावुमा सहभागी झाला असता तर त्याला हा टप्पा गाठणे सहज शक्य झाले असते. मात्र, त्याला रांची वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४६ धावांची महत्त्वाची खेळी सकरणाऱ्या कर्णधार बावुमाने २०१६ मध्ये या फॉरमॅटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दुखापतींनी त्रस्त असलेल्या कारकिर्दीत त्याने ५४ सामन्यांमध्ये ५२ डावात पाच शतके आणि आठ अर्धशतकांसह १,९८७ धावा फटकावल्या आहेत. त्याची सरासरी ४२.२७ इतकी आहे.
दक्षिण आफ्रिकेला भारतात फक्त एकदाच एकदिवसीय मालिका जिंकता आलेली आहे. २०१५-१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २-३ अशी जिंकली होती. त्या मालिकेत एबी डिव्हिलियर्सकडे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व होते. आता बावुमाला डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची आणि भारतात एकदिवसीय मालिका जिंकणारा दुसरा दक्षिण आफ्रिकन कर्णधार बनण्याची मोठी संधी चालून आली आहे.
हेही वाचा : विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडेल का? जाणून घ्या आकडेवारी आणि शक्यता
भात आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात एकदिवसीय मालिकेपूर्वी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ही मालिका ०-२ अशी सहज जिंकली. २००० नंतर दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देणीयकी ही पहिलीच वेळ ठरली आहे.






