Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Steve Smith मोठा निर्णय घेणार? Ashes सिरीज खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणाला…

Steve Smith: सध्या युरोपियन T20 प्रीमियम लीगमध्ये 'ॲमस्टरडॅम फ्लेम्स' या संघाकडून खेळत असलेल्या स्मिथने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 02:29 PM
स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ निवृत्तीच्या मार्गावर ?

स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ निवृत्तीच्या मार्गावर ?

Follow Us
Follow Us:
  • स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ निवृत्तीच्या मार्गावर ?
  • अ‍ॅशेस सिरीज खेळण्याबाबत अनिश्चितता 
  • अ‍ॅशेस सिरीज ऑस्ट्रेलियसाठी अत्यंत महत्वाची
Ashes 2027/Steve Smith: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने 2027 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित अ‍ॅशेस सिरीजमधील आपल्या सहभागाबाबत मोठी अनिश्चितता व्यक्त केली आहे. सध्या 37 वर्षांचा असलेला स्मिथ आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असून, तो आता भविष्याचा मोठा विचार न करता एका वेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान अ‍ॅशेस सिरीज ऑस्ट्रेलियसाठी अत्यंत महत्वाची समजली जाते.

सध्या युरोपियन T20 प्रीमियम लीगमध्ये ‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’ या संघाकडून खेळत असलेल्या स्मिथने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. कसोटी क्रिकेटमधील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्मिथने टी-20 क्रिकेटमधील आपल्या सहभागाबाबत उत्साह दाखवला आहे. 2028 मध्ये लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व करणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे स्मिथने स्पष्ट केले आहे.

PSL 2026 : पदार्पण सामन्यात स्टीव्ह स्मिथने पाडला षटकारांचा पाऊस, इस्लामाबाद युनायटेडला 5 गडी राखून केले पराभूत!

अ‍ॅशेस 2027 मध्ये खेळणार का, या प्रश्नावर उत्तर देताना स्मिथ म्हणाला, “मी सध्या 2027 च्या एशेज मालिकेबाबत कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. माझे वय ३७ वर्षे असून मी आता एका वेळी एकाच मालिकेचा विचार करत पुढे जात आहे. माझे शरीर आणि फॉर्म कशी साथ देतात, यावरच पुढील निर्णय अवलंबून असतील.”

ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या स्टीव्ह स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे पार केले आहेत. स्मिथने आतापर्यंत १२५ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर ३७ कसोटी शतकांची नोंद आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष कसोटी क्रमवारीमध्ये तो इंग्लंडच्या हॅरी ब्रूकनंतर दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

ऑस्ट्रेलियन संघ यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. स्मिथसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बॉल टेंपरिंग प्रकरणानंतर स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करत अनेक विक्रम रचले. मात्र, ज्या देशात त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वाद निर्माण झाला होता, त्याच दक्षिण आफ्रिकेत जाऊन खेळणे हे स्मिथसाठी मोठे आव्हान असेल. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या मालिकेतील स्मिथची कामगिरी कशी राहते, याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Austrelia batsmen steve smith statement about ashes series 2026 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Ashes Series
  • AUS vs ENG
  • Steve Smith

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.