फोटो सौजन्य - X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या ५ सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना पार पडला आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरा सामना हा २ जुलै रोजी सुरु होणार आहे, त्याआधी भारताच्या महिला संघाचे सामने होणार आहेत. त्याचबरोबर अंडर-19 च्या संघाच्या मालिकेला आज सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधार पद हे आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आले आहे.
भारताचा युवा संघ हा 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर २ सामन्याची कसोटी मालिका देखील खेळवली जाणार आहे. भारताचा युवा संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा युवा संघाचे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार 3.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर पहिला युवा एकदिवसीय सामना ईस्ट ससेक्समधील होव्ह येथील काउंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. आयपीएल 2025 मध्ये सामील झालेले स्टार या मालिकेमध्ये खेळताना दिसणार आहेत.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग ही इंग्लड क्रिकेट बोर्डच्या वेबसाइटवर क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर इंग्लड क्रिकेट बोर्ड (ECB) च्या युट्युब चॅनेलवर देखील या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग पाहायला मिळेल. भारत अंडर १९ विरुद्ध इंग्लंड अंडर १९, पहिल्या युवा एकदिवसीय सामन्याचे प्रसारण तपशील कुठे केले जाणार आहेत यासंदर्भात माहिती दिलेली नाही.
आयुष म्हात्रे (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार & विकेटकिपर), हरवंश सिंग (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युधाजित गुहा, मोहम्मद रांगोना, प्रणवेंद्र सिंग, ॲड रॉबर्ट, ॲड.
थॉमस रेव (कर्णधार), राल्फी अल्बर्ट, बेन डॉकिन्स, जेडन डेन्ली, रॉकी फ्लिंटॉफ, अॅलेक्स फ्रेंच, अॅलेक्स ग्रीन, जॅक होम, जेम्स इस्बेल, बेन मेयेस, जेम्स मिंटो, आयझॅक मोहम्मद, जोसेफ मूर्स, सेब मॉर्गन, अॅलेक्स वेड