
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. इंग्लडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारताचा उपकर्णधार रिषभ पंत हा जखमी झाला होता. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून तो क्रिकेटपासून दुर होता. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात रिटायर हर्ट झाल्याने टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये चिंता निर्माण केली. इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंतचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.
पहिल्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत दुसऱ्या डावात ९० धावा केल्या. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडू शरीरावर अनेक वेळा लागल्याने तो रिटायर हर्ट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की रिव्हर्स स्कूप शॉट घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू प्रथम त्याच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर, एक चेंडू त्याच्या मनगटात आणि दुसरा त्याच्या बरगडीला लागला. त्याच्या शरीरावर वारंवार वार झाल्यानंतर, फिजिओसह अनेक लोक मैदानात आले आणि ऋषभ पंत रिटायर हर्ट झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
१४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऋषभ पंतची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मालिकेच्या काही दिवस आधी पंतला दुखापत होणे ही चिंतेची बाब आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताला पहिल्या डावात फक्त २५५ धावा करता आल्या. ध्रुव जुरेलने शानदार शतक झळकावत १३२ धावा केल्या आणि इतर कोणताही फलंदाज २५ धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. आगामी दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा भाग असलेले केएल राहुल, ऋषभ पंत, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिकल सारखे फलंदाज अपयशी ठरले.
Rishabh Pant retires hurt after taking three blows today. First on the helmet, second on the left-hand elbow, third on the abdomen. Tough day for the fighter. ❤️🩹 pic.twitter.com/kdTX8jdM8B — Harsh 17 (@harsh03443) November 8, 2025
तथापि, भारतीय गोलंदाजांनी संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रसिद्ध कृष्णाने तीन, तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट घेत दक्षिण आफ्रिका अ संघाला २२१ धावांवर गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार मार्कस अकरमनने १३४ धावांची शानदार खेळी केली. पहिल्या डावानंतर ३४ धावांची आघाडी घेतल्यानंतर, हे वृत्त लिहिपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून २०० धावा केल्या आहेत.