बजरंग पुनिया : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान मोदींना एक दीर्घ पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मागण्या ऐकून न घेतल्याने पद्मश्री परत करण्याबाबतही बोलले आहे. काल भारताच्या कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताला मोठा धक्का दिला. काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये साक्षी मलिक यांनी निवृत्तीची घोषणा केली.
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। ?? pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia ?? (@BajrangPunia) December 22, 2023
यासंदर्भात त्यांनी ही माहिती x वर दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय कुस्तीपटूंचा एक भाग भारतीय कुस्ती महासंघातील ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपचे खासदार आहेत आणि दीर्घकाळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
नुकतेच पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, तेही ब्रिजभूषण कॅम्पचेच आहेत. अशा स्थितीत गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. यामुळेच बजरंग पुनियाने आपले पदक परत करण्याची घोषणा केली आहे.