Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी टू बॉम्ब’ ने क्रीडा जगतात खळबळ! बांगलादेशातील महिला क्रिकेटपटूंचा लैंगिक छळ; विशेष समिती स्थापन

बांगलादेश महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहांआरा आलमने संघाचे माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते, या प्रकरणी आता चकशी समिति स्थापन केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 07, 2025 | 05:34 PM
'Me Too Bomb' stirs sports world! Sexual harassment of female cricketers in Bangladesh; Special committee formed

'Me Too Bomb' stirs sports world! Sexual harassment of female cricketers in Bangladesh; Special committee formed

Follow Us
Close
Follow Us:

Sexual harassment case of female cricketers in Bangladesh : बांगलादेश महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहांआरा आलमकडून संघाचे माजी मुख्य निवडकर्ता आणि व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. या घटनेने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (बीसीबी) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. बोर्डाने समितीला १५ कामकाजाच्या दिवसांत आपला अहवाल आणि शिफारसी सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

हेही वाचा : राज्य सरकारकडून विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा सन्मान! मंधाना, जेमिमा आणि यादव यांना प्रत्येकी 2.5 कोटींचे बक्षीस

बीसीबीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की महिला क्रिकेट संघाच्या माजी सदस्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोर्ड गंभीर चिंता व्यक्त करत आहे. निवेदनात असे देखील म्हटले आहे की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून म्हणूनच, वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी बोर्डाने एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, आदरयुक्त आणि व्यावसायिक वातावरण राखण्यासाठी ते वचनबद्ध असल्याचे आश्वासन बोर्डाकडून देण्यात आले आहे आणि तपासाच्या निकालांवर आधारित निर्णायक कारवाई करणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

जहानारा आलमकडून अलीकडेच एका माध्यम मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे की,  संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांनी त्यांच्याशी अनुचित असे वर्तन केले होते. त्यांच्या मते, ते परवानगी न घेता त्यांच्या खांद्यावर हात ठेवत असत आणि वैयक्तिक टिप्पणी करत असत ज्यामुळे त्यांना नेहमी अस्वस्थ वाटत असे. त्यांनी असे देखील म्हटले की मंजरुल इस्लाम हे त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी मिठी मारत असत, बहुतेकदा इतर संघ खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे घडत असे.

जहानाराने पुढे  सांगितले आहे  की, त्यांनी या घटनेची तक्रार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी संचालक शफिउल इस्लाम नादेल आणि बोर्डाचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून समिती पुढील दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

हेही वाचा : Women’s ODI World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेटला मिळाली नवसंजीवनी; ‘या’ विश्वचषकाच्या विजेतेपदाने काय दिले?

देशाची सर्वात आदरणीय महिला क्रिकेटपटू

जहानारा आलम बांगलादेशच्या सर्वात आदरणीय आणि प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने देशासाठी ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०.३९ च्या सरासरीने ४८ विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच ८३ टी-२० सामन्यांमध्ये २४.०३ च्या सरासरीने ६० विकेट्स काकढल्या आहेत. भारतातील महिला टी-२० चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेअरब्रेक इन्व्हिटेशनल टी-२० स्पर्धेत भाग घेणारी ती एकमेव बांगलादेशी खेळाडू ठरली आहे.

Web Title: Bangladesh cricket sets up inquiry committee into sexual harassment claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • Bangladesh Cricket Board

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.