Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकला पराभूत करत बांग्लादेशची Women’s Asia Cup Rising Stars 2026 च्या अंतिम फेरीत एंट्री; जेतेपदाच्या लढतीत भारताचे आव्हान 

महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेश अ संघाने पाकिस्तान अ संघाला ५४ धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेश अ संघ आता अंतिम सामन्यात भारतासोबत भिडणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 09:23 PM
Bangladesh defeats Pakistan to enter final of Women's Asia Cup Rising Stars 2026; India to challenge for title

Bangladesh defeats Pakistan to enter final of Women's Asia Cup Rising Stars 2026; India to challenge for title

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh A Women vs Pakistan A Women : बांगलादेश अ महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या अंतिम धडक मारली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेश अ संघाने पाकिस्तान अ संघाला ५४ धावांनी हरवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. या पराभवामुळे पाकिस्तानचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न आता भंग पावले आहे. अंतिम सामन्यात बांग्लादेषसमोर भारताचे आव्हान असणार आहे.

हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड

महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चा अंतिम सामना आता भारत अ आणि बांगलादेश अ संघात खेळवला जमणार आहे. हा सामना २२ फेब्रुवारी रोजी बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर खेवळण्यात येणार आहे. भारतीय महिला अ संघाने श्रीलंका अ संघाचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बांगलादेश महिला अ संघाच्या ११० धावा

बँकॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि बांग्लादेश संघला फलंदाजीसाठी आमंत्रित केल.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. हा संघ नियमित अंतराने विकेट्स गामावत राहीला. संपूर्ण संघ फक्त ११० धावांवर गारद झाला. बांगलादेशची कर्णधार फहिमा खातूनने शानदार फलंदाजी करत ३२ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. या खेळीत फहिमाने पाच चौकार लगावले. तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळू शकली नाही. शर्मिन सुलतानाने १५ धावा दिल्या, तर शमीमाने १३ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार हफसा खालिदने चार षटकांत फक्त २५ धावा देऊन दोन बळी टिपले.

पाकिस्तानचा डाव कोसळला

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा (महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६)संघ ५६ धावांवरच कोसळला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा फलंदाजी क्रम पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला. पाकिस्तानकडून फक्त तीन फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारू शकले. संपूर्ण संघ ५६ धावांवर गारद झाला. शवाल झुल्फिकारने सर्वाधिक १४ धावांची खेळी केली.  हफसाने १५ चेंडूत १२ धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत जाता आले नाही. चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशची संजिदा अख्तर मेघलाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर फहिमा खातूनने २ बळी घेतली.

हेही वाचा : NZ vs PAK, T20 World Cup : पाक आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार पहिला सुपर 8 सामना! खेळपट्टीसह हवामान कसे असेल? वाचा सविस्तर

अंतिम फेरीत बांगलादेशचा सामना भारताशी होईल. पहिल्या उपांत्य फेरीत, राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Web Title: Bangladesh enter final of womens asia cup rising stars 2026 by defeating pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.