भारत वि दक्षिण आफ्रिका(फोटो-सोशल मीडिया)
India vs South Africa head-to-head record, T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या साखळी सामन्यात भारतीय संघाने अपराजित राहून दिमाखात सुपर एटमध्ये एंट्री केली आहे. आता टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे.
सुपर ८ मधील भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारताने मागील हंगामातील त्यांचा शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता, त्यामुळे घरच्या परिस्थितीचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाने देखील आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत प्रभावी कामगिरी बजावली आहे.दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि आत्मविश्वासाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला.
दोन्ही संघांमधील २० षटकांच्या स्वरूपातील सामने नेहमीच रोमांचक स्थितीत जाऊन पोहचले आहेत. भारताने क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात चांगलेच वर्चस्व गाजवले आहे. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने अनेक वेळा मजबूत आव्हान उभे केले आहे. मागील रेकॉर्ड बघता विश्वचषक सामन्यांमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे, परंतु मोठ्या मंचावरील प्रत्येक सामना नवीन इतिहास रचत असतो, त्यामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगला खेळ करावा लागणार आहे.
या सामन्याचा निकाल हा दोन्ही संघांची भविष्यातील रणनीती कशी आहे यावर ठरणार आहे. विजयी संघाला अंतिम चारमध्ये जाण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, तर पराभूत संघाला आगामी सामन्यांमध्ये वाढत्या दबावाचा सामना करावा लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ यांच्यात एकूण आंतरराष्ट्रीय सामने ३५ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने २१ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेला १३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामाना रद्द झाला आहे. तसेच या संघांमध्ये एकूण ७ टी२० विश्वचषक सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये देखील भारताने आपला दबदबा राखला आहे. भारताने या स्पर्धेत ५ सामन्यात विजय मिलवलय आहे. तर दक्षिण आफ्रिकेने २ सामने आपल्या खिशात टाकले आहेत.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, जेसन स्मिथ, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन स्टब्स, क्वेना मफाका.
भारत : इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.






