
फोटो सौजन्य - KFC Big Bash League सोशल मिडिया
Sydney Sixers vs Hobart Hurricanes : बिग बॅश लीग २०२५-२६ हंगामाचा शेवट जवळ आला आहे. या स्पर्धेचे शेवटचे सामने शिल्लक आहेत, आजचा शेवटचा एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. सिडनी सिक्सर्सच्या संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. सिडनी सिक्सर्स संघाचा सलामीवीर फलंदाज स्टिव्ह स्मिथवर आज चाहत्यांची नजर असणार आहे. तर या सामन्यात सिडनी सिक्सर्सचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्कच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
पर्थ स्कॉर्चर्सने अंतिम फेरी गाठली आहे. आज, स्पर्धेचा चॅलेंजर सामना सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजेता देखील अंतिम फेरीत पोहोचेल. दोन्ही संघांमध्ये अनेक सामना जिंकणारे खेळाडू आहेत, म्हणूनच चाहते हा सामना कधी आणि कुठे पाहू शकतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
चाहते स्टार स्पोर्ट्सवर हा चॅलेंजर सामना पाहू शकतात. चाहते JioHotstar वर देखील डिजिटल पद्धतीने सामना पाहू शकतात, जो भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १:१५ वाजता होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत असाधारण कामगिरी केली आहे, ज्यामुळे ते या टप्प्यावर पोहोचले आहेत. बाद फेरीत, होबार्ट हरिकेन्सने पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्सचा पराभव केला.
Two teams so close to The Final, but only one will get there! This is The Challenger 👀 #BBL15 pic.twitter.com/eMlI0HepbT — KFC Big Bash League (@BBL) January 22, 2026
दरम्यान, पात्रता फेरीत सिडनी सिक्सर्सचा पर्थ स्कॉर्चर्सकडून पराभव झाला. या सामन्यात बाबर आझम सिडनीकडून खेळणार नाही. तथापि, स्टीव्ह स्मिथ आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. मिशेल स्टार्क देखील त्याच्या गोलंदाजीने कहर करू शकतो. होबार्ट हरिकेन्सच्या फलंदाजांना स्टार्कपासून सावध राहावे लागेल. होबार्टची गोलंदाजी देखील खूप मजबूत असल्याचे दिसून येते.
सिडनी सिक्सर्स संघ: स्टीव्ह स्मिथ, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मोइसेस हेन्रिक्स (कर्णधार), लाचलान शॉ, जॅक एडवर्ड्स, मिचेल पेरी, जोएल डेव्हिस, बेन मॅनेंटी, बेन द्वारशुइस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, डॅनियल ह्यूजेस, हेडन केर, जॉर्डन सिल्क.
होबार्ट हरिकेन्स संघ : मिचेल ओवेन, टिम वॉर्ड, ब्यू वेबस्टर, बेन मॅकडर्मॉट, निखिल चौधरी, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ख्रिस जॉर्डन, विल प्रेस्टविज, नॅथन एलिस (कर्णधार), रिशाद हुसेन, बिली स्टॅनलेक, रिले मेरेडिथ, जॅक्सन बर्ड, मॅकअॅलिस्टर राईट.