
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय
बीसीसीआय बोर्डाने घेतला बंदीचा निर्णय
‘हनीट्रॅप’चे जाळे आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन निर्णय
BCCI New Rules For IPL 2026 Players: आयपीएल 2026 चा थरार मैदानावर रंगला आहे. रोज चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मात्र मैदानावर आयपीएल सुरू असतानाच, मैदानाच्या बाहेर मात्र मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएल खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर असे काही निर्णय बीसीसीआयने घेतले आहेत. नेमके हे प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊयात.
खेळाडूंच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंना टार्गेट करण्यासाठी आखले जाणारे ‘हनीट्रॅप’चे जाळे आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन बीसीसीआयने मोठी पावले उचलली आहेत. आता खेळाडूंच्या हॉटेल रूममध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बीसीसीआय बोर्डाने थेट बाहेरील व्यक्तींसाठी बंदी जाहीर केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय जारी केला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अँटी करप्शन प्रोटोकॉल’चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video
सध्याच्या आयपीएल हंगामात काही ‘अनधिकृत’ व्यक्ती खेळाडूंसोबत प्रवास करत असल्याचे, हॉटेल आणि टीम बसमध्ये थेट प्रवेश मिळवत असल्याचे आणि थेट खेळाडूंच्या खोल्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, त्यावर आता बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे. याच कारणामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि आयपीएलची प्रतिष्ठा राखण्यासाठी बीसीसीआयने बाहेरील व्यक्तींच्या हॉटेल रूममधील प्रवेशावर तात्काळ बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात?
आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएलचा 50 वा सामना होत आहे. लखनौ आणि आरसीबी आमनेसामने आले आहेत. दरम्यान सध्या भारताचा फिरकीपटू आणि पंजाब किंग्जचा प्रमुख गोलंदाज युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ विमानातील आहे. या व्हिडिओत तो ई-सिगरेट पीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चहल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Look at Yuzvendra Chahal, man. He was risking everyone’s safety by vaping an e-cigarette inside the flight while Shashank Singh and other Punjab Kings players were around him. 👀 This is totally unacceptable and highly risky for everyone. Such behavior violates flight safety… pic.twitter.com/YnXlPmPhjr — Sonu (@Cricket_live247) May 7, 2026
व्हिडिओत पाहिले असता, युझवेंद्र चहल दोन हाताच्या मध्ये काहीतरी वस्तु घेऊन त्याचा वास किंवा ओढताना दिसून येत आहे. तसेच त्यानंतर त्याला खोकला असे लागल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे त्याने ई सिगारेट ओढली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान त्याने खरेच ई सिगारेट ओढली आहे का ते या व्हिडिओमधून स्पष्ट होताना दिसून येत नाहीये.