Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा टीम इंडियाबाबत 'हा' मोठा निर्णय; भारतीय संघ एकही...
BCCI News: लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. यंदा ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारत कोणताही सराव सामना खेळणार नाहीये. बीसीसीआयने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बांग्लादेश, अफगाणिस्तान, साऊथ आफ्रिका आणि अन्य संघ सराव सामने खेळणार आहेत. 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान सराव सामने खेळले जाणार आहेत. भारताचा संघ या स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत कोणतेही सराव सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. भारताने नुकतीच इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. आता 15 फेब्रुवारी रोज भारतीय संघ दुबईला रवाना होणार आहे.
साऊथ आफ्रिका, बांग्लादेश, अफगाणिस्तान संघ पाकिस्तानच्या ‘ए’ संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहेत. सराव सामने खेळण्यासाठी पाकिस्तानने तीन संघ तयार केले आहेत. अफगाणिस्तान 156 फेब्रुवारी रोजी न्यूझीलँडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र भारत नुकताच इंग्लंडविरुद्ध खेळला असल्याने भारत कोणताही सराव सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
Champions Trophy 2025 मधून जसप्रीत बुमराह बाहेर
टीम इंडिया आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. स्पर्धेपूर्वी जाहीर होणारा अंतिम संघही जाहीर करण्यात आला आहे. वाईट बातमी अशी आहे की, जसप्रीत बुमराह संघात नाही. बुमराहच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली आहे आणि तो काही काळ विश्रांती घेणार आहे. मात्र, बुमराहच्या या दुखापतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचीच मोठी चूक आहे. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान रोहितने ही मोठी चूक केली.
हेही वाचा: Champions Trophy 2025 : रोहित शर्माच्या चुकीने जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; हिटमॅनचा निर्णय पडला महागात
रोहित शर्माने केली मोठी चूक
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. हा सामना सिडनीमध्ये खेळला जात होता. यामागील कारण म्हणजे बुमराह प्रत्येक सामन्यात सातत्याने लांब स्पेल टाकत होता. बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाचा दुसरा कोणताही गोलंदाज बुमराहइतका प्रभावी नव्हता. जेव्हा जेव्हा संघाला विकेटची गरज पडायची तेव्हा रोहित चेंडू बुमराहकडे सोपवायचा. यामुळे, बुमराहचा गोलंदाजीचा स्पेल कधी-कधी खूप लांबत होता. त्यामुळे त्याच्या पाठीच्या खालच्या भागावर परिणाम झाला आणि त्याला मोठी दुखापत झाली. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला पाठीचा त्रास झाला. यानंतर तो स्कॅनसाठी रुग्णालयात गेला आणि सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही.