Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG Semi Final: इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल; ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज

कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील हा संघ २०२४ च्या सेमीफायनलमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे. जोस बटलर सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत असला, तरी इंग्लंडचे इतर पाच खेळाडू भारतीय संघासाठी 'व्हिलन' ठरू शकतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 02, 2026 | 09:34 PM
इंग्लंडचे 'हे' ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल (Photo Credit- X)

इंग्लंडचे 'हे' ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल
  • ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज
  • जाणून घ्या कोण आहे ते
India National Cricket Team vs England National Cricket Team: टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा थरार ५ मार्च रोजी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. साखळी फेरीत अडखळत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने ‘सुपर-८’ मध्ये दमदार पुनरागमन करत अंतिम चारमध्ये धडक मारली आहे. कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील हा संघ २०२४ च्या सेमीफायनलमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे. जोस बटलर सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत असला, तरी इंग्लंडचे इतर पाच खेळाडू भारतीय संघासाठी ‘व्हिलन’ ठरू शकतात.

१. विल जॅक्स (Will Jacks) अष्टपैलू कामगिरीचा धाक

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. त्याच्या फिरकीने फलंदाजांना भंडावून सोडले असून बॅटनेही त्याने खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. आतापर्यंत ७ सामन्यांत १७६ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने त्याने १९१ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ७ बळी टिपले आहेत. वानखेडेच्या खेळपट्टीवर जॅक्सची अष्टपैलू खेळी भारताचे समीकरण बिघडू शकते.

२. हॅरी ब्रूक (Harry Brook) शतकी खेळीने वाढवला आत्मविश्वास

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुपर-८ फेरीत पाकिस्तानविरुद्ध त्याने ठोकलेले झंझावाती शतक टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. ७ सामन्यांत १६१ च्या स्ट्राईक रेटने २२८ धावा करणाऱ्या ब्रूकमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मधल्या षटकांत त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

३. फिल साल्ट (Phil Salt) पॉवरप्लेमधील ‘स्फोटक’ फलंदाज

सलामीवीर फिल साल्ट जरी या स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारू शकला नसला (७ सामन्यांत १२५ धावा), तरी पॉवरप्लेमध्ये तो अत्यंत धोकादायक ठरतो. साल्टने जर इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली, तर भारतीय फिरकीपटूंवर दडपण येऊ शकते. त्याची आक्रमक शैली सुरुवातीच्या षटकांत भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.

४. आदिल रशीद (Adil Rashid) भारतीय फलंदाजांचा ‘कर्दनकाळ’

अनुभवी लेग-स्पिनर आदिल रशीदला भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करणे नेहमीच आवडते. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताच्या विरोधात रशीदची इकॉनॉमी अवघी ७.५० इतकी आहे. भारत-इंग्लंड टी-२० संघर्षात तो सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे (१८ सामन्यांत १४ बळी). चालू विश्वचषकात भारतीय फलंदाज फिरकीसमोर चाचपडत असताना रशीदचा स्पेल निर्णायक ठरेल.

५. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) ‘मुंबई इंडियन्स’चा अनुभव ठरणार गेमचेंजर?

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ७ सामन्यांत १० बळी घेत आपली लय गवसल्याचे दाखवून दिले आहे. आर्चरने आयपीएलमध्ये ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळताना वानखेडे स्टेडियमवर बराच वेळ घालवला आहे. येथील खेळपट्टी आणि वातावरणाचा त्याला सखोल अनुभव आहे. हाच अनुभव भारताच्या अव्वल फळीतील फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

Web Title: These 5 england players can single handedly turn the match result against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • cricket news
  • England
  • IND Vs ENG
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड
1

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’! भर शोमध्ये पतीलाच दिले इंग्रजीचे धडे; मजेशीर VIDEO VIRAL…
2

मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’! भर शोमध्ये पतीलाच दिले इंग्रजीचे धडे; मजेशीर VIDEO VIRAL…

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?
3

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनचा चौकार आणि षटकार पाऊस; मोडला ‘मुंबईच्या राजा’चा विक्रम
4

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनचा चौकार आणि षटकार पाऊस; मोडला ‘मुंबईच्या राजा’चा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.