
BCCI announces WPL 2026 schedule! When and where will the first match be held? Read in detail
WPL 2026 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यावेळी, ही स्पर्धा देशातील दोन प्रमुख शहरे, नवी मुंबई आणि वडोदरा येथे आयोजित करण्यात आली होती. WPL चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांच्याकडून नवी दिल्ली येथे झालेल्या मेगा लिलावादरम्यान तारखा आणि ठिकाणांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा उद्घाटन सामना ९ जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण पहिला टप्पा तिथेच होणार आहे. डी. वाय पाटील स्टेडियमवर अलीकडेच महिला एकदिवसीय विश्वचषक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. ज्यामुळे ते महिला प्रीमियर लीगसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून पुढे आले आहे.
पहिल्या टप्प्यानंतर, सर्व संघ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि अंतिम सामन्यासाठी वडोदरा येथे खेळला जाणार आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियम ५ फेब्रुवारी रोजी नॉकआउट सामने आणि भव्य अंतिम सामना आयोजित करण्यात येणार. मागील वर्षीप्रमाणे, ही स्पर्धा एका कारवां मॉडेलमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये संघ एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणार आहेत.
आतापर्यंत, सर्व महिला प्रीमियर लीगचा हंगाम फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तथापि, यावेळी, पुरुषांचा T20 विश्वचषक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे. यामुळे WPL एक महिना आधीच जानेवारी-फेब्रुवारी विंडोमध्ये हलवावा लागला आहे. दोन्ही स्पर्धांमधील संघर्ष टाळण्यासाठी बीसीसीआय आधीच हे नियोजन करत होते.
महिला प्रीमियर लीगचे तीन हंगाम खेळून झाले आहेत. या मध्ये मुंबई इंडियन्स गतविजेता संघ राहिला आहे. प्रत्येक हंगामात, लीगला तीव्र स्पर्धा आणि उत्कृष्ट प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे.
२०२६ च्या वुमन प्रीमियर लीगच्या लिलावात अनेक खेळाडूंना मोठी बोली लागली आहे. यांमदये दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने राईट टू मॅच कार्ड वापरून ३.२० कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहेत. न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना पुन्हा विकत घेतले आहे.
हेही वाचा : WPL 2026 Auction : WPL इतिहासात दीप्ती शर्मा दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली! यूपी वॉरियर्सने दाखवले मोठे मन