महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आज या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई इंडियन्स फलंदाजी करणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला प्रीमियर लीग २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला यूपीने ₹३.२ कोटी (US$१.२ दशलक्ष) मध्ये खरेदी केली आहे. दीप्ती शर्मा ही खेळाडू महिला प्रीमियर लीग लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा मेगा लिलावाची सर्वच क्रिकेट चाहते फारच उत्सुकतेने वाट पाहात होतेम तो आता सुरू झाला आहे. न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिनला गुजरात जायंट्सने २ कोटींना खरेदी केले आहे.
महिला प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात एकूण 177 खेळाडूंवर बोली लावली जाईल, जरी जास्तीत जास्त 73 खेळाडू विकल्या जातील. या मेगा लिलावात मल्लिका सागर खेळाडूंसाठी लिलावकर्ता असेल.