BCCI is looking for a new coach! There are rumours of a change in CEO coaching..
BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्स (सीओई) साठी नवीन कोचांची निवड प्रक्रीयेला सुरवात झाली आहे. यामागे कारण म्हणजे सध्या कार्यरत अनेक प्रशिक्षकांसोबत करार संपत असल्याने नवीन भरती करणे आवश्यक ठरले आहे. विशेष म्हणजे, सीओई प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा करारही या वर्षाच्या शेवटी संपणार असून ते पद सोडण्याचा विचार करत आहेत.
ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटर आणि सीओईचे सध्या गेंदबाजी प्रशिक्षक असलेले ट्रॉय कूली यांचा तीन वर्षांचा करार संपल्यामुळे, त्यांच्या जागी माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्हीआरव्ही सिंह यांना नेमण्याची शक्यता आहे. सिंह यांनी कूलीसोबत आधीही काम केले आहे. याशिवाय, गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे कोच पद रिकामे झाले आहेत. मार्चमध्ये मेडिकल टीमचे प्रमुख नितीन पटेल यांनी राजीनामा दिला, तर फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साइराज बहुतुले राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग टीममध्ये गेले आहेत. त्याचबरोबर, सितांशु कोटक सीओईसोडून राष्ट्रीय संघाचे फलंदाजी कोच बनले आहेत.
हेही वाचा : Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित
बीसीसीआयने सीओईमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि स्पोर्ट्स मेडिसिन या प्रमुख पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदारांनी प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनुभवासह बीसीसीआयचे लेवल २ किंवा ३ कोचिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, कमीतकमी पाच वर्षे राज्यस्तर किंवा उच्च दर्जाच्या युवा क्रिकेटमध्ये कोचिंग अनुभव असावा लागेल. स्पोर्ट्स मेडिसिन प्रमुखासाठी क्रीडा विज्ञानात पदव्युत्तर पदवी आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२५ आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण आपल्या कार्यकाळाची मुदत वाढवण्यास इच्छुक नाहीत, परंतु बीसीसीआय त्यांना २०२७विश्वचषकापर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे लवकरच सीओईमध्ये मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.