Pension money is showered on retired cricketers! The amount of money increases every year...
How much is the pension provided by BCCI? : भारतीय क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी यावर्षी निवृत्ती घेतली आहे.त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मासह अगदी अलिकडेच निवृत्ती घेतलेल्या चेतेश्वर पुजाराचे नाव सामील झाले आहे. भारतीय खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्या खेळाडूंना बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येतं. या पेन्शनचा आकडा किती असतो? आणि ते वर्षानुवर्षे किती वाढते? याबाबत अमेकांना माहिती नसते. चाहत्यांना याबबत जाणून घेण्याची खूप इच्छा असते. याबाबत आपण आज जाणून घेऊया.
बीसीसीआयकडून त्यांच्या माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना दरमहा पेन्शन म्हणून अशी एक निश्चित रक्कम देण्यात येते. पेन्शनची रक्कम ही खेळाडूंच्या सामन्यानुसार आणि खेळाच्या पातळीनुसार ठरवण्यात येत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO
बीसीसीआयने तयार केलेल्या पेन्शन योजनेत खेळाडूंचे वय देखील महत्वाचे ठरते. खेळाडूचे वय वाढत असताना, त्यांच्या पेन्शनची रक्कम देखील वाढवण्यात येते. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूने वयाची ६० वर्षे पूर्ण केली असतील तर त्यांची पेन्शनची रक्कम देखील वाढवण्यात येत असते.
वृत्तानुसार, दरवर्षी बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पेन्शन रकमेत कोणती वाढ होत नाही. परंतु, बीसीसीआयकडून वेळोवेळी या रकमेत बदल करत असते. गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंच्या पेन्शनमध्ये अनेक वेळा वाढ केली गेली आहे. महागाई आणि बदलत्या काळात माजी क्रिकेटपटूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बीसीसीआयकडून सुरू केलेल्या पेन्शन योजनेचा फायदा फक्त त्याच क्रिकेटपटूंना मिळू शकतो, ज्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत किंवा दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत्याने योगदान दिले आहे. याशिवाय महिला क्रिकेटपटूंनाही पेन्शनचा लाभ देण्यात येतो. पंच आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO
मागील काही वर्षांमध्ये बीसीसीआयकडून पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पेन्शन रकमेत ३७,५०० वरून ६०,००० प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच प्रथम श्रेणीतील खेळाडूंचे पेन्शन देखील १५,००० वरून ३०,००० प्रति महिना केले गेले आहे. याशिवाय, ज्या ज्येष्ठ खेळाडूंना पूर्वी ५०,००० पेन्शन देण्यात येत होते. त्यांना आता दरमहा ७०,००० पेन्शन देण्यात येते.