अर्शदीप सिंग(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : अलिकडेच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळून मायदेशी परतला आहे. या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार कामगिरी करून मालिका २-२ अशी बरोबरीत राखली. या मालिकेमध्ये संघात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा देखील समावेश होता. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकले नाही. याबाबत आता आशिया कप २०२५ पूर्वी पंजाबच्या प्रशिक्षकांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे
हेही वाचा : Photos : चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर आता ‘हे’ 3 भारतीय खेळाडू क्रिकेटला अलविदा म्हणण्याच्या तयारीत..
आशिया कप २०२५ च्या अगदी काही दिवस आधी पंजाबचे गोलंदाजी प्रशिक्षक गगनदीप सिंग यांनी अर्शदीप सिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तो म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी जेव्हा तो इंग्लंडमध्ये होता, तेव्हा मी त्याच्याशी (अर्शदीप सिंग) संवाद साधला. त्याला संधी मिळत नसल्याने तो अस्वस्थ असल्याचे दिसत होता. मी त्याला फक्त सांगितले की तुला तुझ्या योग्य वेळेची वाट पहावी लागणारआहे.”
गगनदीप पुढे म्हणाला की, “मला वाटते की तो इंग्लंडमध्ये खेळायला पाहिजे होता. कारण तो एक स्विंग गोलंदाज आहे आणि त्याची ऊंची देखील आहे. सर्व काही ठीक होते. मला संघ संयोजन माहित नाही, कदाचित प्रशिक्षक (गौतम गंभीर) आणि कर्णधार शुभमन गिल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल.” असे गगनदीप म्हणाला.
हेही वाचा : वसीम अक्रमचा ‘तो’ विश्वविक्रम माहितीये का? अद्याप एकाही गोलंदाजाला जमलेली नाही अशी कामगिरी
पंजाबचे प्रशिक्षक गगनदीप याने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीबद्दल देखील सांगितले. गगनदीप पुढे म्हणाला की, “तो अधिक स्विंग आणि अधिक अचूकतेसह एक उत्तम गोलंदाज बणण्याची क्षमता ठेवतो, ते तो बनू शकतो. मी गेल्या काही महिन्यांपासून त्याला पाहिलेले नाही, परंतु आशा आहे की जेव्हा जेव्हा मी त्याला पाहत आलो तेव्हा मी त्याचे चांगले मूल्यांकन करू शकेन. अलिकडच्या सामन्यांमध्ये मी जे पाहिले आहे त्यावरून तर असे दिसून येत आहे की, की तो लाईन आणि लेंथ, यॉर्कर चेंडू आणि बाउन्सरवर अधिक काम करू शकतो, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिक प्रभावी चेंडू आहेत, टेसाठी मदत होईल.”