डेवॉल्ड ब्रेव्हिस(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ही सिरिज २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे. या सामन्यादरम्यान डेवॉल्ड ब्रेव्हिसने आक्रमक फलंदाजी कळे केली. संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्याने २८ चेंडूंचा सामना करत १७५.०० च्या स्ट्राईक रेटने ४९ धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने दोन चौकार आणि पाच षटकार लगावले. या तिसऱ्या सामन्यादरम्यान एक घटना घडली, जी पाहून सर्वच हसू लागले.
जेवियर बार्टलेट या २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने एक चेंडू ब्रेव्हिसला टाकला. तो आधीच तयार असलेल्याने त्याने चेंडू सीमारेषेबाहेर घुमवला. ब्रेव्हिसने मारलेल्या या शॉटमध्ये इतकी ताकद होती की चेंडू स्टेडियमबाहेर गेला. जिथे सामन्याचा आनंद घेत असलेल्या काही चाहत्यांकडून चेंडू पकडण्यासाठी स्पर्धा झाल्याचे दिसून आले. एकाने चेंडू मिळताच तो ठिकावरून धावण्यास सुरुवात केली, पण कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्याने चेंडू परत केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
DEWALD BREVIS SMASHED A SIX OUT OF THE GROUND. 🤯pic.twitter.com/MTtFcVGxFT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2025
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात आफ्रिकने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. परंतु, तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत दोन गडी गमावून ४३१ धावांचा डोंगर उभा केला. ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेडने १०३ चेंडूत १४२ धावा, कर्णधार मिशेल मार्शने १०६ चेंडूत १०० धावा आणि कॅमेरॉन ग्रीनने ५५ चेंडूत नाबाद ११८ केल्या तर अॅलेक्स कॅरीने ३७ चेंडूत ५० धावा फटकावल्या.
हेही वाचा : Photos : चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर आता ‘हे’ 3 भारतीय खेळाडू क्रिकेटला अलविदा म्हणण्याच्या तयारीत..
ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या ४३२ धावांचा पाठलाग करताना संपूर्ण आफ्रिकन संघ २४.५ षटकांत १५५ धावांतच गडगडला. डेवाल्ड ब्रेव्हिस (४९) व्यतिरिक्त, टोनी डी झोर्झीने ३० चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले, मात्र इतर खेळाडूंना मात्र तग धरता आला नाही. परिणामी आफ्रिका संघाला २७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.