फोटो सौजन्य - X
भारतीय सैन्य : आयपीएल 2025 ची ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेला तणावाचा वातावरणामुळे दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता 17 मे पासून आयपीएल 2025 ला रिस्टार्ट करण्यात आले आहे. पण बंगरूळमध्ये मुसळधार पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला. आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याआधी आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध लढा लढला त्यानंतर आता सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय सैन्याला बीसीसीआय विशेष सन्मान देणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.
आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यातील सामना सुरू होण्याच्या ५ मिनिटे आधी भारतीय सैन्याला विशेष श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. पण राष्ट्रगीत ७:२५ वाजता वाजवले जाईल. सर्व खेळाडूंव्यतिरिक्त, सपोर्ट स्टाफ देखील राष्ट्रगीतमध्ये सहभागी होतील. संपूर्ण देशाला अभिमान वाटणाऱ्या भारतीय सैन्यासाठी बीसीसीआयने हा समारंभ आयोजित केला आहे.
18 सामने, 97 विकेट्स! कोण आहे हर्ष दुबे? भारतीय संघात मिळाली पहिल्यांदाच संधी
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे उधळून लावले.
यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. पण आता आयपीएल २०२५ पुन्हा एकदा येत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने भारतीय सैन्यासाठी एक खास पाऊल उचलले आहे. बेंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. कारण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. चाहते विराटला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.