क्रिकेट विश्वातील देव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या प्रत्येक पोस्टची नेहमी चर्चा होते. आणि त्यावर चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद आणि प्रेम देखील मिळते. आज रक्षाबंनधनाचा सण आहे याच पार्श्वभूमीवर साराने तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या ट्रेन्ड होतो आहे.
सारानं रक्षाबंधनापूर्वी तिला भावाकडून मिळालेल्या गिफ्टबाबत इन्स्टाग्राम पोस्टमधून खुलासा केला आहे. आणि हे खास गिफ्ट दिलंय तिचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकर याने. अर्जुनने साराला एक खास हॅन्डबॅग गिफ्ट केली आहे. याच हॅन्डबॅगसोबतचा एक फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याखाली रक्षाबंधनाआधीच दिलेल्या या खास गिफ्टसाठी तिने अर्जुन याला ‘थँक्य यू’ म्हटल आहे.
साराचे इन्स्टाग्रामवर तब्बल २. २ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या या रक्षाबंनधनच्या गिफ्टच्या पोस्टवरही चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.