खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था, पाणीटंचाईचे संभाव्य संकट आणि वादळी पावसाची भीती अशा समस्यांचा सामना सध्या म्हसळामधील नागरिकांना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे.
आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याचप्रकरणी कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन करण्यात आले.
अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी चिमूर जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पनवेल शाखेतर्फे १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.
मासिक सभेतील गदारोळ आणि सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या सभात्यागानंतर सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाण्यात वाढती गुंडगिरी, ड्रग्सची समस्या आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी केदार दिघे यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली.
एनसीएलटीच्या कामकाजात मुंबई खंडपीठाने देशात अव्वल स्थान मिळवत विक्रमी कामगिरी केली आहे. मात्र, सदस्यांची रिक्त पदे आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. केंद्राच्या विशेष पथकाने चास परिसरासह निमगाव वाघा येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणीपुरवठा विभागातील कथित घोटाळ्यावरून जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी सभापतींच्या राजीनाम्याची मागणी करत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आणि पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
पनवेल शहराचा विस्तार होत असल्याने जय भारत नाक्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र आता पनवेलच्या रहिवाशांची वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येतून सुटका झाली आहे. कारण रस्त्यातील अडथळे ठरणारे बांधकाम…
‘वसुधरा पायी दिंडी २०२६’ तेलंगणा येथील रामानंद संप्रदायाच्या जुहूक उपपीठातून श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने रवाना झाली. हजारो भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत.
मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या भूमिगत मेट्रोच्या ‘ॲक्वा लाईन’ने मोठा टप्पा गाठला आहे. संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना प्रवासी संख्येने ७ कोटींचा आकडा पार केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेता रझा मुराद यांनी भावुक होत श्रद्धांजली अर्पण केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक सक्षम व एकसंध करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स अथॉरिटी’ म्हणजेच ITLA स्थापन करण्यात येणार आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी सहाण-मोठी गाव ते बायपासदरम्यान खराब झालेला रस्त्याचा पेंच फोडून त्याठिकाणी पुन्हा काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र आता या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अपुरा आणि असमान पावसाचा थेट परिणाम कापूस पिकावर झाला आहे. अनेक भागांत कापसाची पाती व फुले गळणे, बोंडांची संख्या कमी राहणे आणि पिकाची वाढ खुंटणे, अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
वसई-विरार महापालिकेच्या नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्याच्या प्रस्तावाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. नाट्यगृहाला ज्येष्ठ रंगकर्मी मास्तर दत्ताराम वालावलकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली असून, मागणी…
वसई-विरार महापालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘भीक मांगो’ आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहार आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवल्याच्या आरोपांवरून हे आंदोलन करण्यात आले.