फोटो सौजन्य - BCCI
IND VS ENG 1st Test Update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक आहेत आणि टीम इंडिया मध्ये तिसरा क्रमांकावर कोण खेळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. सोशल मीडियावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन आणि करून नायर यांची नावे समोर येत आहेत. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कोण फलंदाजी करणार आणि सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात कोण उतरणार हे स्पष्ट झाले आहे. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानावर शुभमन गिल फलंदाजी करणार आहे तर पाचव्या स्थानावर भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत येणार आहे.
तथापि, बीसीसीआयने आज एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून असा अंदाज लावला जात आहे की करुण नायरला पहिल्या कसोटीत प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते. जर करुण नायर याचे संघामध्ये स्थान पक्के झाले तर अंतिम 11 मध्ये आला तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळु शकते. गेल्या ८ वर्षांपासून तो एकही कसोटी खेळलेला नाही.
ENG vs IND : WTC सायकलचा होणार आज शुभारंभ! भारत इंग्लंडशी भिडणार; जाणून घ्या सामना कसा पहायचा
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये करुण नायर म्हणाला की, “माझे लक्ष्य नेहमीच या संघात पुनरागमन करणे होते. दररोज जेव्हा मी जागे होतो तेव्हा मी कसे पुनरागमन करू शकतो याचा विचार करायचो. पुन्हा एकदा भारतीय जर्सी घालणे ही एक खास अनुभूती आहे,” असे करुण नायरने बीसीसीआयने एक्स वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
This is Karun Nair and he is 𝗥𝗲𝗮𝗱𝘆 𝗧𝗼 𝗚𝗼! 👍 👍#TeamIndia | #ENGvIND | @karun126
— BCCI (@BCCI) June 20, 2025
शुभमन गिल याने इंडियन प्रीमियर लीग 2025 आणि 2024 मध्ये गुजरात टायटनचा कर्णधारपद सांभाळले होते. मागील सीझनमध्ये तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही पण या सीजनमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि संघाला क्वालिफायर राउंड पर्यंत पोहोचवले होते. त्याची चांगली कॅप्टनसी पाहून भारतीय संघामध्ये त्याला निवडण्यात आले आहे. आता भारतीय संघासाठी कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संघासाठी हा दौरा फारच महत्त्वाचा असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी हा इंग्लंड दौरा फायदेशीर ठरेल. आणि दिग्गज खेळाडू संघाबाहेर झाल्या आहेत पण अनेक नवे खेळाडूंचा चांगला फॉर्म आहे त्यामुळे ते भारतीय संघाला या मालिकेमध्ये विजय मिळवून देण्यात यश मिळवतात की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.