
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचे स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही विजय हजारे ट्राॅफीचे सामने खेळले आणि त्यांना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी बीसीसीआयने खेळाडूंसाठी कडेकोट बंदोबस्त लावला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याव्यतिरिक्त केएल राहुल, रिषभ पंतसारखे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आता भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल देखील या स्पर्धेमध्ये सामील होणार आहे.
ज्याप्रमाणे फलंदाजी दिग्गज विराट कोहलीने त्यांचे विजय हजारे ट्रॉफी (VHT) चे दोन्ही सामने सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे प्रेक्षकांशिवाय खेळले, त्याचप्रमाणे शनिवारी जयपूरमधील जयपुरिया कॉलेज मैदानावर पंजाब विरुद्ध सिक्कीम संघाच्या सामन्यादरम्यान भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निर्देशानुसार, भारतीय कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ३ आणि ६ जानेवारी रोजी सिक्कीम आणि गोवा विरुद्ध पंजाबचे पुढील दोन विजय हजारे ट्रॉफी सामने खेळणार आहे.
गोवा विरुद्धचा सामना केएल सैनी स्टेडियमवर होईल, तर स्थानिक कॉलेजच्या मैदानावर सिक्कीम विरुद्धचा सामना सुरक्षेच्या कारणास्तव आणि बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रेक्षकांशिवाय खेळवला जाईल. “या सामन्यांच्या वेळी शाळेतील विद्यार्थांना आणि कर्मचाऱ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जातो पण त्यासाठी देखील सुरक्षा असते. कॉलेज कॅम्पसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.
ते म्हणाले, “विजय हजारे ट्राॅफीच्या सामन्यांचे वेळापत्रक फार आधीच बनवण्यात आले होते. रोहित शर्मामुळे चाहत्यांमध्ये असलेल्या उत्साहामुळे मुंबईचा सामना अनंतम स्टेडियमवरून सवाई मानसिंग स्टेडियमवर हलवावा लागला.” कोहली आणि रोहित शर्माच्या सामन्यांप्रमाणे, गिलचा सामना देखील टेलिव्हिजन किंवा लाईव्ह स्ट्रीम केला जाणार नाही. गिल आणि अर्शदीप दोघेही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “गिल आणि अर्शदीप संध्याकाळपर्यंत पोहोचणार होते, परंतु उत्तर भारतातील खराब हवामानामुळे त्यांचे विमान उशिरा पोहोचले आहे. जर हवामान अनुकूल राहिले तर ते रात्री उशिरापर्यंत पोहोचतील.”