PBKS vs RCB Final Match: Big blow to Virat Kohli before IPL final! Action taken in Bengaluru...
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सर्वांच्या नजरा उद्या होणाऱ्या या महामुकाबल्याकडे लागून राहिल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात चांगल्या लयीत दिसून येत आहे. आरसीबी आता पहिल्या आयपीएल ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर आहे. पंजाबला पराभूत करून पहिली ट्रॉफी पटकावण्याचा प्रयत्न आरसीबी करणार आहे. पण त्याआधी आरसीबीचा खेळाडू विराट कोहलीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बेंगळुरूमधील विराट कोहलीच्या मालकीच्या पब, वन८ कम्यूनला पुन्हा एकदा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या दरम्यान, तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) २००३ अंतर्गत पबविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ कस्तुरबा रोडवर हा पब आहे.
हेही वाचा : RCB Vs PBKS : बंगळुरूचे विजेतेपद ठरणार दुःखाचे कारण! Virat Kohli देणार IPL ला निरोप? पहा Video
विराटच्या पबविरुद्ध एफआयआर
बेंगळुरू पोलिसांकडून विराट कोहलीच्या वन८ कम्यून पबविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पबमध्ये धूम्रपान क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर १ जून रोजी क्यूबन पार्क येथील पोलिस ठाण्याकडून पब व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान, पबने धूम्रपान क्षेत्राबाबत आवश्यक नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे.
हे तंबाखू उत्पादने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. जे त्यांचे पालन करत नाहीत त्यांना कायदेशीररित्या गुन्हेगार मानण्यात येते. यापूर्वीही विराट कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
यापूर्वी गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये देखील बंगळुरू पोलिसांकडून विराट कोहलीच्या या पबवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पब रात्री १ वाजेपर्यंत उघडा असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे शहराच्या नियमांविरुद्ध होतेया असे सांगण्यात आले होते. त्याच वेळी, डिसेंबर २०२४ मध्ये, ग्रेटर बंगळुरू महानगरपालिकेकडून अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पबला नोटीस बजावण्यात आली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की विराट कोहलीचा वन८ कम्यून पब खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये देखील शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.