विराट कोहली(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सचा दणदणीत पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाचा सामना खेळावण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ त्यांच्या पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरणार आहेत. यावर्षी दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत आश्चर्यकारक अशी कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खूप अटीतटीचा पाहायला मिळाला. आरसीबी आणि पंजाब किंग्ज दोघांकडेही एकापेक्षा जास्त खेळाडू उपलब्ध आहेत. पंजाब किंग्जकडे श्रेयस अय्यर, जोश इंग्लिश आणि अर्शदीप सिंगसारखे जबरदस्त बलाढ्य खेळाडू आहेत. त्याच वेळी, आरसीबीमध्ये विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूच्या उपस्थितीने संघाचा उत्साह दुणावला आहे. परंतु अंतिम सामन्यात विराट कोहलीला पंजाब किंग्जच्या खेळाडूपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : RCB Vs PBKS : बंगळुरूचे विजेतेपद ठरणार दुःखाचे कारण! Virat Kohli देणार IPL ला निरोप? पहा Video
या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली दमदार लयीत फलंदाजी करताना दिसत आहे. आयपीएल २०२५ च्या १४ डावांमध्ये त्याने ५५.८१ च्या सरासरीने एकूण ६१४ धावा काढल्या आहेत. या दरम्यान, विराट कोहलीच्या बॅटमधून ८ अर्धशतके देखील आली आहेत. पण अंतिम सामन्यात त्याला पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगपासून सावध राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीसमोर आयपीएलमध्ये १० वेळा अर्शदीप सिंग आला आहे. यामध्ये तो दोनदा अर्शदीप सिंगचा शिकार ठरला आहे.
तथापि, विराट कोहलीने १७५.४३ च्या स्ट्राईक रेटने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने त्याच्या ५७ चेंडूंमध्ये १०० धावा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळू शकते.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या दोन्ही संघाबाबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या दोघांकडे देखील आयपीएल ट्रॉफीचे विजेतपद नाही. यापूर्वी, २०१४ मध्ये पंजाब किंग्जने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांचा पंजाबला पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, आरसीबी २०१६ मध्ये सुद्धा अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु त्या वर्षी त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांपैकी एक संघ पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.