फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
What is the reason of Shane Warne’s death? : ऑस्ट्रेलियाचा संघ हा क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये शेन वॉर्न, डेव्हिड वॉर्नर, मिचेल जॉनसन, ट्रॅव्हिस हेड यांसारख्या कमालीच्या खेळाडूंची नावे समोर येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी एक काळ गाजवला होता. अजूनही ते भारतीय संघामध्ये मात देण्यासाठी सक्षम आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे याबद्दल सविस्तर वाचा.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न यांचे ४ मार्च २०२२ रोजी थायलंडमध्ये निधन झाले. यानंतर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ३ वर्षांनंतर ब्रिटिश माध्यमांनी या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. अहवालानुसार, माजी क्रिकेटपटूचा मृतदेह सापडलेल्या थायलंड व्हिलामधून एक सेक्स ड्रग देखील जप्त करण्यात आले आहे. पण हा प्रश्न हाताबाहेर जाऊ नये म्हणून, पोलिस अधिकाऱ्यांनी खोलीची झडती घेतली आणि खोलीतून सेक्स ड्रग काढून टाकले.
एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर डेली मेलला सांगितले की, शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याच्या खोलीची झडती घेतली जात होती तेव्हा तिथे कामाग्रा नावाचे सेक्स ड्रग सापडले, जे खूप शक्तिशाली मानले जाते. हे औषध थायलंडमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहे आणि ते भारतात तयार केले जाते. शेन वॉर्नच्या मृत्यूमागे हे सेक्स ड्रग असू शकते असे पोलिस अधिकाऱ्याचे मत आहे. याशिवाय, अधिकाऱ्याने सांगितले की त्याला वरून सेक्स ड्रग काढून टाकण्याचे आदेश मिळाले आहेत. जरी अधिकृतपणे त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे मानले जात होते. अजुनपर्यत यासंदर्भात खोल माहिती दिली नाही त्यामुळे लवकरच यावर खुलासा केला जणार आहे असे समोर आले आहे.
शेन वॉर्नने १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी, १९४ एकदिवसीय आणि ५५ आयपीएल सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना वॉर्नने ७०८ विकेट्स घेतल्या. या काळात, त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ७१ धावांत ८ बळी घेणे होती. याशिवाय, १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने २९३ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने ३३ धावा देऊन ५ बळी घेतले. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ५७ विकेट्स होत्या.
याशिवाय, कसोटी सामन्यात फलंदाजी करताना शेन वॉर्नने ३१५४ धावा केल्या होत्या. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९९ धावा होती आणि त्याच्या बॅटमधून १२ अर्धशतके आली. एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना वॉर्नने १०१८ धावा केल्या होत्या, त्यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले होते.