विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli : विराट कोहली मैदान असो वा मैदनाबाहेर नेहमी चर्चेत असतो. आता देखील विराट कोहली चर्चेत आला आहे. किंग कोहलीने 15 सेकंदात आपल्या चाहत्यांना सर्वात मोठा आनंद दिला आहे. आजवर चाहत्यांच्या मनात घर करून बसलेल्या एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर त्याने देऊन टाकले आहे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असावा की, विराट कोहलीने असे काय केले किंवा काय बोलले? खरं तर त्याचे धागे त्याच्या निवृत्तीबाबत नसून 2027 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणे किंवा न खेळण्याबाबत आहेत. विराट कोहलीने 15 सेकंदात या मुद्द्यावर जे काही सांगितले ते आश्चर्यकारक नक्कीच आहे.
हेही वाचा : MI vs KKR : सूर्यकुमार यादवचा T-20 मध्ये भीम पराक्रम, असे करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीच्या भवितव्याबद्दल आणि 2027 च्या विश्वचषकामध्ये खेळण्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच याविषयी बरीच चर्चा देखील झाली आहे. पण, आता कोहलीने याबाबत आपले इरादे स्पष्ट करून टाकले आहेत. सोशल मीडियावर चालणाऱ्या 15 सेकंदांपेक्षा देखील कमी वेळात एका व्हिडिओमध्ये विराट कोहली स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याला 2027 चा विश्वचषक फक्त खेळायचा नाही तर तो जिंकायचा देखील आहे.
विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला की, सध्या त्याचे मोठे पाऊल कोणते असणार आहे? याबाबत काही हिंट तो देऊ शकतो का? यावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, मला माहित नाही की माझे पुढचे मोठे पाऊल काय असणार आहे? पण कदाचित असे होऊ शकते की मी 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करू शकणार आहे.
Question: Seeing In The Present, Any Hints About The Next Big Step?
Virat Kohli Said: The Next Big Step? I Don’t Know. Maybe Try To Win The Next World Cup 2027.🏆🤞 pic.twitter.com/aq6V9Xb7uU
— virat_kohli_18_club (@KohliSensation) April 1, 2025
हेही वाचा : LSG vs PBKS : १४० च्या वेगाने त्याला रेवांचल एक्स्प्रेस बनवलं; सलूनच्या दुकानातून मिळाले स्वप्नांना पंख..
वास्तविक पाहता, विराट कोहली सध्या तरी निवृत्तीचा विचार करत नसल्याबाबत या 15 सेकंदाच्या व्हिडिओवरून तरी स्पष्ट झाले आहे. जर तो आता कशाचाही विचार करत बसला असता तर तो 2027 चा विश्वचषक खेळण्याचा आणि जिंकण्याचा असाच आहे.
काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने मुंबईने आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात गोलंदाज पदार्पणवीर अश्विनी कुमारने टिच्चून गोलंदाजी करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत 4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले.