फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कपची सर्वांनाच उत्सुकता आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत, यात दोन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. दुसऱ्या गटामध्ये बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाॅगकाॅंग हे देश आहेत. आशिया कप २०२५ ची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांचा उत्साहही वाढत आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगाचे या हाय व्होल्टेज सामन्यावर लक्ष आहे.
Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
हा सामना चाहत्यांचे खूप मनोरंजन करतो, तर ब्रॉडकास्टर्सनाही खूप कमाई होते. सोनी नेटवर्क्सकडे आशिया कपचे टेलिव्हिजन हक्क आहेत. त्यांनी आगामी स्पर्धेसाठी जाहिरातींची रेट लिस्ट जारी केली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान सोनी फक्त १० सेकंदात भरपूर पैसे कमवणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, भारताच्या आशिया कप २०२५ सामन्यांच्या जाहिरातींच्या यादीची किंमत प्रति १० सेकंदांच्या स्लॉटसाठी १४-१६ लाख रुपये आहे.
अधिकृत मीडिया हक्क धारक सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) द्वारे जाहिरातदारांना जारी केलेल्या जाहिरात कार्ड दरानुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान टीव्हीवर १० सेकंदांच्या जाहिरातीची किंमत १६ लाख रुपये असेल. टीव्हीवर जाहिरात पॅकेजेस
आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तथापि, भारत पाकिस्तानविरुद्ध खेळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रत्यक्षात, पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत काय दृष्टिकोन स्वीकारतो हे काळच सांगेल.