फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा स्टार किंग कोहलीने त्याच्या कामगिरीने जगभरामध्ये नाव कमावले आहे. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही जगभरामध्ये आहे, त्याने अनेक रेकाॅर्ड नावावर केले आहेत. १८ ऑगस्ट २००८… ही तारीख सामान्य असू शकते, पण या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये एक तारा उदयास आला, ज्याने येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला वेड लावले. तो मुलगा, जो फक्त १९ वर्षांचा होता, तो खेळाडू म्हणून मैदानावर आला नव्हता, तो लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी आला होता. आपण विराट कोहलीबद्दल बोलत आहोत.
१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या दिल्लीच्या या स्टार फलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करताच आपले हेतू स्पष्ट केले की माघार घेणे त्याच्या स्वभावात नाही आणि नंतर एक असा प्रवास सुरू झाला जो नंतर “किंग कोहली” ची कहाणी बनला. बरोबर १७ वर्षांपूर्वी, विराट कोहलीने आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
१७ वर्षांपूर्वी, कोहलीने श्रीलंकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कोहलीने गौतम गंभीरसोबत डावाची सुरुवात केली, तर आजचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा त्यावेळी ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. भारताची सुरुवात चांगली नव्हती. गंभीर लवकर बाद झाला आणि कोहलीवर दबाव आला.
विराटने चौकार मारून काही लय मिळवली आणि तो १२ धावांवर फलंदाजी करत होता, पण नुवान कुलशेखराच्या इनकमिंग चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. चेंडू बाहेरून आत गेला आणि कोहलीने तो चुकवला. त्यामुळे त्याचे पदार्पण निराशाजनक झाले. टीम इंडियाने हा सामना ८ विकेट्सने गमावला.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने एकूण २७५९९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळून ८२ शतके केली आहेत, तर त्याच्या नावावर १४३ अर्धशतके आहेत. किंग कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे, ज्यामध्ये त्याने ३०२ सामन्यांमध्ये १४१८१ धावा केल्या आहेत.