Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नाइट क्लबबाहेर नेमकं काय घडलं? Video Viral

Brydon Carse handcuffed in Nightclub incident: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स अडचणीत सापडला आहे. डर्बी येथील एका नाईटक्लबबाहेर पोलीस त्याला बेड्या घालून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 02:57 PM
Brydon Carse handcuffed in Nightclub incident

Brydon Carse handcuffed in Nightclub incident

Follow Us
Follow Us:
  • Brydon Carse ला बेड्या!
  • ECB करणार चौकशी
  • नाइट क्लबमध्ये असं काय घडलं?
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स वादात सापडला आहे. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी डर्बी येथील एका नाईटक्लबबाहेर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नंतर ‘द टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये डर्बीमधील एका नाईटक्लबबाहेर पोलीस अधिकारी कार्सला घेऊन जात असल्याचे दिसले होते. या घटनेनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली आहे. त्यावेळी कार्स इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळत नव्हता.

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

केव्हा घडली ही घटना?

ब्रायडन कार्स हा पाकिस्तानविरुद्धच्या इंग्लंडच्या कसोटी संघात होता , पण अंतिम संघात स्थान न मिळाल्याने त्याला डरहॅमसाठी काउंटी चॅम्पियनशिपचा सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली. डरहॅमने तीन दिवसांत डर्बीशायरचा पराभव केला. त्या सामन्यात कार्सने २६ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतले. सामन्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी पोहोचला तेव्ही ही घटना घडली.

द टेलिग्राफ’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्सचे हात पाठीमागे बांधले आहेत. त्याच्या हातात बेड्या आहेत. त्याचा डरहॅम संघातील सहकारी मॅथ्यू पॉट्सशी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स देखील दिसत आहे. परंतु, व्हिडिओ समोर आला असला तरी, या घटनेचे कारण आणि पोलिसांनी कार्सला कोणत्या परिस्थितीत ताब्यात घेतले, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

One more Night club issue at England 😭😭 Ban stokes spot behind Brydon Carse ☠️ pic.twitter.com/qCAzHDLWv3 — Bhargav Jani (@IndianBhargav) August 24, 2026

ईसीबीने काय म्हटले?

ईसीबीने रविवारी या प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केले आणि म्हटले की, ‘शनिवारी रात्री डर्बीमध्ये घडलेल्या एका घटनेची आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सध्या तपास करत आहोत. शक्य झाल्यावर आम्ही अधिक माहिती देऊ.’ डर्बीशायर कॉन्स्टेब्युलरीलाही प्रतिक्रियेसाठी विचारण्यात आले आहे, तर डरहॅमने या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

दुसऱ्या कसोटीतील सहभागावरही प्रश्नचिन्ह

कार्स लंडनमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघात पुन्हा सामील होणार होता. त्यानंतर, गुरुवारी सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी लॉर्ड्सवर दोन दिवसांचा सराव होणार होता. मात्र, या घटनेनंतर, दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंग्लंड क्रिकेटची संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत

कार्स प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा इंग्लंड संघ खेळाडूंच्या रात्रीच्या पार्ट्या आणि मद्यपानामुळे आधीच टीकेचा विषय बनले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेदरम्यान, बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन यांना विजयाच्या सेलिब्रेशनशी संबंधित एका घटनेच्या चौकशीसाठी निलंबित करण्यात आले होते. नंतर अशी माहिती मिळाली की त्यांनी कोणतेही हिंसक वर्तन केले नव्हते, परंतु त्यांच्या करारातील काही अटींचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना लेखी चेतावणी देण्यात आली.

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

Web Title: Brydon carse handcuffed nightclub incident ecb investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • ben stokes
  • England cricket

संबंधित बातम्या

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम
1

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
2

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
3

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
4

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.