Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालपणीचं स्वप्न अखेर पूर्ण! ‘ब्लू जर्सी’ घालून टीमचं नेतृत्व करणं म्हणजे आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न :- Harmanpreet Kaur

जगज्जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भावनिक प्रतिक्रिया; “हे फक्त आमचं नाही, संपूर्ण देशाचं स्वप्न होतं.”

  • By Dilip Bane
Updated On: Nov 04, 2025 | 03:21 PM
India Womens World Cup 2025

India Womens World Cup 2025

Follow Us
Close
Follow Us:

“आज आपण कुठे चाललो आहोत? आपण चाललो आहोत आयुष्यातील त्या क्षणांना कैद करायला, ज्याचं स्वप्न बालपणापासून पाहिलं होतं,” — या शब्दांत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराने HARMANPREET KAUR आपल्या भावना व्यक्त केल्या.

ट्रॉफी हाती घेतल्यानंतर तिने सांगितलं, “मला वाटतं हेच ते स्वप्न होतं, ज्याच्यासाठी मी वर्षानुवर्षं मेहनत घेत होती. आज तो दिवस अखेर आला आहे आणि मी अतिशय उत्साहित आहे. माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे, कारण लहानपणापासून वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं आणि आता मला माझ्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.”

CAPTAIN HARMANPREET KAUR AT THE GATEWAY OF INDIA. 🇮🇳pic.twitter.com/UmnsWZuU9x — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2025

ती पुढे म्हणाली, “मी ज्या गोष्टी मनापासून मागितल्या, त्या देवाने एकएक करून पूर्ण केल्या. आज सगळं काही जादूसारखं वाटतंय. सगळं काही योग्य ठिकाणी बसतंय.”2017 च्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतरच्या आठवणींनाही तिने उजाळा दिला. “तेव्हा आम्ही फक्त नऊ धावांनी हरलो होतो आणि मन पूर्णपणे खचलं होतं. पण जेव्हा आम्ही भारतात परतलो, तेव्हा जनतेने आम्हाला दिलेलं प्रेम आणि प्रोत्साहन पाहून जाणवलं की हा फक्त आमचाच प्रवास नाही, तर संपूर्ण देशाचं स्वप्न आहे,” असं ती म्हणाली.

भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral

तिने सांगितलं, “या विजयामागे संपूर्ण देश आहे, मैदानावर असलेले चाहते, टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक, सगळ्यांच्या प्रार्थना आणि आशिर्वाद मिळूनच हा विजय शक्य झाला.”बालपणीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, “माझ्या पप्पांच्या किट बॅगमधला मोठा बॅट तेव्हा माझ्यासाठी खूप खास होता. पप्पांनी तो कापून छोटा करून मला दिला आणि त्या दिवसापासून मी खेळायला सुरुवात केली. तेव्हा महिला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हती, पण स्वप्न मात्र एकच होतं — एक दिवस ‘ब्लू जर्सी’ घालायची आणि देशासाठी खेळायचं.”

ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले

ती शेवटी म्हणाली, “हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ती छोटी मुलगी, जिला माहिती नव्हतं की महिला क्रिकेट असतं तरी काय, तिचं हे स्वप्न आज पूर्ण झालं आहे. म्हणूनच मी सांगते, स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका. विश्वास ठेवा, कधी, कसं होईल माहीत नाही; फक्त हे होईल, यावर विश्वास ठेवा.”

Web Title: Captain harmanpreet kaur india womens cricket wining world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Womens World Cup

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 
1

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश
2

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर
3

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…
4

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.