फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड : आज चॅम्पियन ट्रॉफीचा चौथा सामना रंगणार आहे, ग्रुप बी मधील दोन दमदार संघ आज एकमेकांशी भिडणार आहेत. आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे तर पॅट कमिन्स अनुपस्थित ऑस्ट्रेलियाचा संघ स्टीव्ह स्मिथच्या कॅप्टन्सीमध्ये खेळणार आहे.
आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ थोडा कमकुवत दिसत आहे, कारण संघाचे मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आजचा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीची चांगली सुरुवात करू इच्छितात.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असणार आहे. या सामन्याचे टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, मोबाईलवर पाहणारे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टारवर असेल, जिथे तुम्ही सामना मोफत पाहू शकता येणार आहे.
The Ashes rivalry enters its next chapter at #ChampionsTrophy 2025 🏏
How to watch the big clash 👉 https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/mY9Ha4WDph
— ICC (@ICC) February 22, 2025
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १६० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कांगारू संघाने ९० सामने जिंकले आहेत, त्याशिवाय इंग्लंडने ६५ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसतो. एकीकडे श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ येत असताना, दुसरीकडे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंडचा पराभव केला.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्मिथ म्हणाला, “इतर आयसीसी स्पर्धांच्या तुलनेत, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही, परंतु मला वाटते की मोठ्या स्पर्धेत खेळण्याच्या दबावाखाली आम्ही नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करतो.” चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक वेगळी स्पर्धा असल्याने येथे एकदिवसीय विश्वविजेता असणे अप्रासंगिक आहे हे देखील स्मिथने स्पष्ट केले.
तो म्हणाला, “मला वाटतं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करावी लागेल. इथे तुम्ही वर्ल्ड कपप्रमाणे हळू सुरुवात करू शकत नाही. म्हणून खेळाडूंना आमचा संदेश असा आहे की त्यांनी प्रत्येक सामना क्वार्टर फायनलसारखा हाताळावा.”
फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रुक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.