फोटो सौजन्य - Chennai Super Kings
चेन्नई सुपर किंग्स : आयपीएल २०२५ चा हा सिझन चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी अत्यंत निराशाजनक राहिला आहे. संघाचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना फक्त 2 सामन्यात विजय मिळाला आहे तर 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची अवस्था खूपच वाईट आहे. पाच वेळा विजेता सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यांनी आतापर्यंत ११ पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत आणि दहाव्या स्थानावर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. संघाने त्यांचा बालेकिल्ला चेपॉक येथे पण ते विशेष कामगिरी करू शकले नाही संघामध्ये या सीझनमध्ये ११ सामन्यात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत
चालू सीझनमध्ये, ऋतुराज गायकवाड याच्या जागेवर आयुष म्हात्रे याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर गुर्जपनीत सिंग याच्या जागेवर डेवॉल्ड ब्रेव्हिस याला संघामध्ये स्थान मिळाले आहे आणि याचा फायदा चेन्नईच्या संघाला झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी चांगली खेळी खेळली आहे. आता एका नवीन खेळाडूने सीएसके संघामध्ये प्रवेश केला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने उर्विल पटेलला आपल्या संघात सामील करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पटेलने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत २८ चेंडूत शतक ठोकून खळबळ उडवून दिली. हे एका भारतीय खेळाडूचे संयुक्तपणे सर्वात जलद टी-२० शतक झळकावले आहे.
Say Yellove to Urvil Patel! 💪🏻💛
PS: This young lion has the joint fastest 💯 in the Syed Mushtaq Ali Trophy to his credit!
Roar loud and proud, Urvil! 🦁🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/hxyOzWVSnP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 5, 2025
जखमी वंश बेदीच्या जागी चेन्नई सुपर किंग्सने २६ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज पटेलला करारबद्ध केले आहे. डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे बेदीला चालू सिझनला मुकावे लागले. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. ‘अनकॅप्ड’ पटेल ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर चेन्नई संघात सामील झाला आहे. त्याने आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही. त्याने ४७ टी-२० सामन्यांमध्ये ११६२ धावा केल्या आहेत. तो आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग होता .
SRH vs DC Toss Update : दिल्ली कमबॅक करणार का? पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
“चेन्नई सुपर किंग्जने वंश बेदीच्या जागी उर्विल पटेलला करारबद्ध केले आहे,” असे आयपीएलने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. गुजरातचा विकेटकिपर-फलंदाज उर्विलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक ठोकून भारतीय खेळाडूंकडून सर्वात जलद टी-२० शतकाचा विक्रम संयुक्तपणे केला होता. २०२३ च्या आवृत्तीत उर्विल गुजरात टायटन्सचा भाग होता . तो ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर सीएसकेमध्ये सामील झाला आहे. सीएसके त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स , राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सशी सामना करेल.
एमएस धोनी (कॅण्ड विकेट), शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथिशा पाथीराना, शिवम दुबे, रविचंद्रन अश्विन, जेमी ओव्हरटन, कमलेश, विष्णु कृष्णा, कृष्णा, जैमी ओव्हरटन राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी , नॅथन एलिस, आंद्रे सिद्धार्थ सी, उर्विल पटेल.