Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती प्रीमियर लीग : २८० खेळाडू, १४ संघांची दमदार निवड!

अकोल्यातील छत्रपती प्रीमियर लीग सीझन ४ चा लिलाव सोहळा जल्लोषात पार पडला असून १४ संघांनी २८० खेळाडूंची निवड करून स्क्वॉड मजबूत केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 09:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या छत्रपती प्रीमियर लीग सीझन ४ चा लिलाव सोहळा
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पेठचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे होते
  • नेक खेळाडूंना पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या या लीगमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी
अकोल्यातील स्थानिक क्रिकेटला नवी ऊर्जा देत ग्रामीण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या छत्रपती प्रीमियर लीग सीझन ४ चा लिलाव सोहळा जल्लोषात पार पडला. दोन गटांतील १४ संघांनी तब्बल २८० खेळाडूंची निवड करत आपापले संघ अधिक मजबूत केले. यामुळे कार्यक्रमस्थळी क्रिकेटप्रेमी, संघमालक आणि युवा-अनुभवी खेळाडूंची मोठी गर्दी उसळली.

BIG NEWS! भारत भूषवणार Commonwealth Games 2030 चे यजमानपद! अहमदाबादमध्ये रंगणार रणसंग्राम 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पेठचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख रमेश गायकवाड, माजी सभापती आकाश शिरसाट, ज्येष्ठ पंच राजेश दूधगम गोटू, नंदकिशोर सुलताने, कृष्णा मेतकर, अजय पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

लिलावादरम्यान फलंदाजी, गोलंदाजी आणि ऑलराऊंड क्षमतेच्या आधारे संघमालकांनी खेळाडूंवर जोरदार बोली लावत चतुर रणनीती आखली. अनेक नवोदित क्रिकेटपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त किमती मिळाल्या, तर काही अनुभवी खेळाडूंनादेखील संघांनी प्राधान्य देत स्क्वॉड मजबूत केला. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या या लीगमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.

लीगचे सामने जिमखाना क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून मैदान, लाइव्ह स्कोअरिंग, अंपायरिंग आणि तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे आयोजकांनी सांगितले. दर्जेदार सामने, चुरशीची टक्कर आणि रोमांचक क्षण यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

IND vs SA Test: काय घडतंय टीम इंडियात? दुसऱ्यांदा व्हाईटवॉश झाल्यावर दिनेश कार्तिक संतापला; म्हणाला- “विरोधी संघ आता भारताला…”

१४ नामांकित संघांची स्पर्धा

या लीगमध्ये ‘अ’ गटात द मास्टर, मंगलमूर्ती, उमरी योद्धा, मनीष टायटन्स, नॅशनल एबी स्पोर्ट्स, एकता, टर्मिनेटर हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात एएसके, एटीएस, ऑरेंज आर्मी, तुळजाई टायगर्स, अनोखा इलेव्हन, अंबिका, वेस्ट अकोला या संघांचा समावेश आहे. लिग पद्धतीनंतर उपांत्य फेरी, सेमी फायनल आणि अंतिम सामन्यातून विजेता निश्चित केला जाणार आहे.

ऑक्शनच्या यशस्वीतेसाठी प्रशांत दामले, संग्राम कांबळे, दीपक शुक्ला, निखिल क्षीरसागर, नंदकिशोर सुलताने, यांसह सर्व संघप्रतिनिधींचा उत्साह उल्लेखनीय होता. तर संपूर्ण आयोजनात हरगोविंद सिंग रोहेल, मयूर निकम, प्रवीण अंभोरे, कावळे, यादव, वानखेडे यांनी सक्रिय योगदान दिले. छत्रपती प्रीमियर लीगमुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय पातळीवर जाण्याचे नवे दार उघडत असून स्थानिक क्रीडा चळवळीला मोठी चालना मिळत आहे.

Web Title: Chhatrapati premier league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • cricket

संबंधित बातम्या

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
1

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण
2

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल
3

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने
4

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.