Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम

चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 02:50 PM
Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम
Follow Us
Close
Follow Us:
  • चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड
  • हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम
  • २.८ किलोमीटर अंतरासाठी १७ ते १८ अंश तापमाना लढवली खिंड
 

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.

हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग व धावणे या तीन टप्प्यांचा समावेश असतो. प्रचंड थंड वातावरण, खडतर पर्वतीय मार्ग, कमी ऑक्सिजन आणि तीव्र चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करावी लागते. या स्पर्धेत आकाश लकेश्री यांनी पोहण्याच्या २.८ किलोमीटर अंतरासाठी १७ ते १८ अंश तापमानाच्या थंड पाण्यात अवघ्या ५३ मिनिटांचा वेळ घेतला. त्यानंतरच्या ८८ किलोमीटर सायकलिंग टप्प्यात २४०० मीटर चढाचा सामना करत चार तास २७ मिनिटांत त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. शेवटचा आणि सर्वात कठीण मानला जाणारा २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा १७०० मीटर चढासह तीन तास २१ मिनिटांत पूर्ण करत त्यांनी एकूण आठ तास ५२ मिनिटांत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

आकाश लकेश्री हे मूळचे खेर्डी येथील असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. २०१८ साली त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून एमबीए सुरू केले होते; मात्र फी भरण्यासाठी निधीअभावी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याच काळात त्यांनी ट्रायथलॉन हा खेळ निवडत आयुष्याला नवे वळण दिले. पुण्यातील दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षणास प्रारंभ केला. स्पोर्ट्स मॅनेजमेंट संस्थेत काम करताना त्यांचा सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संपर्कात येण्याचा योग आला. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेत २०१८पासून त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणाला गती दिली.

JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार

२०२०मध्ये दुबईमध्ये स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळात ते चिपळूणमध्ये परतले आणि २०२१मध्ये रत्नागिरी येथे कोचिंग सुरू केले. त्यानंतर २०२२-२३ मध्ये पुन्हा पुण्यात स्थलांतर करून त्यांनी क्रीडा प्रशिक्षण सुरू ठेवले. २०२४मध्ये त्यांनी ‘स्काय एंडुरन्स क्लब’ या नावाने स्वतःचे कोचिंग सेंटर सुरू केले. आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून नेपाळमध्ये झालेल्या एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून या स्पर्धेत भाग घेणारे भारतातील पहिले खेळाडू ठरले.

हिमालयीन स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी लेह–लडाख येथे कठोर प्रशिक्षण घेतले. त्या काळात भारत–पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ते लेहमध्येच अडकले होते. मात्र प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी सराव सुरू ठेवला आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर आजचे उल्लेखनीय यश प्राप्त केले. त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा हा सुंदर परिपाक असल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी नमूद केले आहे.

आजवरच्या आपल्या या प्रवासात अभिजीत यादव, सचिन खेर, संजय इथापे, विजय अनपट, शंतनु शितोळे यांचे मार्गदन सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
आकाश लकेश्री यांच्या या यशामुळे चिपळूणचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळले आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ashes 2025 : कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन, पण मुख्य वेगवान गोलंदाज अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा काय आहे?

    Ans: 2.8 किमी पोहणे 88 किमी सायकलिंग (2400 मीटर चढासह) 21 किमी धावणे (1700 मीटर चढासह) अत्यंत थंड हवामान, उंच पर्वत, कमी ऑक्सिजन आणि धोकादायक चढ-उतार यामुळे ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक ठरते.

  • Que: आकाशची पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा कोणती होती?

    Ans: २०२० साली दुबईमध्ये स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली, जी त्यांच्या करिअरमधील मोठी पायरी ठरली.

  • Que: हिमालयीन स्पर्धेसाठी आकाशने कोणती तयारी केली?

    Ans: लेह–लडाखमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले. भारत–पाकिस्तान तणावामुळे ते काही दिवस लेहमध्ये अडकले होते, तरीही त्यांनी सराव थांबवला नाही.

Web Title: Chipluns akash lakeshri selected for world championship sets record in himalayan extreme triathlon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ratnagiri
  • Sports

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
1

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा
2

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार
3

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

AFG vs WI : चेंडू लागल्याने रहमानउल्लाह गुरबाज जमिनीवर कोसळला, थोडक्यात बचावला खेळाडू! Video Viral
4

AFG vs WI : चेंडू लागल्याने रहमानउल्लाह गुरबाज जमिनीवर कोसळला, थोडक्यात बचावला खेळाडू! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.