Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

राज्य कामगार विमा महामंडळाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील बंद करण्यात आलेले दवाखाने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 23, 2026 | 09:27 PM
संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्य कामगार विमा महामंडळाचा महत्वाचा निर्णय
  • संगमनेर तालुक्यातील बंद करण्यात आलेले दवाखाने पुन्हा सुरु
  • सुमारे १० हजार विमाधारक कामगारांना दिलासा
संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार विमाधारक कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत यापूर्वी बंद करण्यात आलेले दवाखाने आता पुन्हा सुरू होणार आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठोस मांडणी आणि शासनस्तरीय समन्वयामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय शक्य झाला आहे.

कामगार राज्य विमा महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संगमनेर येथे दवाखाने तात्काळ सुरू करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. संगमनेर परिसरात विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, स्थानिक पातळीवर दर्जेदार व तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक होते.

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा

कामगार व खासगी उद्योगांची होती मागणी

या निर्णयामुळे विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना औषधोपचार, तपासण्या व अन्य आरोग्यसेवांसाठी आता शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे.

या संदर्भात समाधान व्यक्त करताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर येथे कामगार विमा योजनेअंतर्गत दवाखाना सुरू व्हावा, अशी मागणी कामगार संघटनांमार्फत तसेच खासगी उद्योग समूहांकडून सातत्याने होत होती. नगरपालिका निवडणुकीच्या काळात शहरातील मालपाणी उद्योग समूहातील कामगारांच्या बैठकीत आपण याबाबत शब्द दिला होता, तो आज पूर्ण होत आहे.

नागपूर अधिवेशनात निर्णायक बैठक

या विषयावर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक झाली होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने सकारात्मक निर्णय घेत संगमनेरमध्ये दवाखाने सुरू करण्यास मान्यता दिल्याबद्दल आमदार खताळ यांनी संबंधित सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

कामगारांकडून आमदार अमोल खताळ यांचे आभार

ज्या कामगारांच्या वेतनातून नियमितपणे कामगार विम्याची रक्कम वजा केली जाते, त्या सर्व कामगारांना या दवाखान्याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील संघटित तसेच असंघटित कामगार वर्गातून आमदार अमोल खताळ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दवाखाने सुरू झाल्यानंतर कामगार वर्गाला दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Esic started closed hospitals in sangamner taluka relief for 10000 insured workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • esic
  • Marathi News
  • Sangamner

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
1

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा
2

अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार
3

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Chandrapur News: डिजिटल युग तरीही बँकेत रांगा! प्रशिक्षणाच्या अभावामुळे वृद्ध व अशिक्षित ग्राहक अडचणीत
4

Chandrapur News: डिजिटल युग तरीही बँकेत रांगा! प्रशिक्षणाच्या अभावामुळे वृद्ध व अशिक्षित ग्राहक अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.