Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir : पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? ट्रोलर्सला कोच गंभीरने दिले सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर भारतीय संघाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पाँटिंगच्या या विधानाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 11, 2024 | 11:31 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

कोच गंभीर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टीम सामान्यांची कसोटी मालिका भारतामध्ये झाली. यामध्ये भारताच्या संघाला तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि टीम इंडियाने मालिका गमावली. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यावर पदावर देखील मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर सगळेच प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनीही यावर माइंड गेम्स खेळायला सुरुवात केली आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीच्या गेल्या 5 वर्षातील 2 शतकांवर चिंता व्यक्त केली होती, जेव्हा भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पाँटिंगच्या या विधानाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गजांना सडेतोड उत्तर दिले.

हेदेखील वाचा – NZ vs SL : ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीची कमाल! न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेने जिंकलेला सामना गमावला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी, आज म्हणजेच सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यादरम्यान त्यांनी पाँटिंगला हे उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अलीकडेच विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हणाला होता की, मी विराटबद्दल एक आकडेवारी वाचली, त्यात म्हटले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने केवळ दोन (तीन) कसोटी शतके झळकावली आहेत, हे खरे आहे. तसे दिसत नाही पण तसे असेल तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षात केवळ दोनच कसोटी शतके झळकावणारा जगातला एकही अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नसेल.

गौतम गंभीरला पाँटिंगने केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. रोहित आणि विराट हे कमालीचे बलवान खेळाडू आहेत.

हेदेखील वाचा – WI vs ENG : कॅप्टन बटलरने केला चौकार आणि षटकार पाऊस! वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर केलं पराभूत

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी काल म्हणजेच रविवारी 10 नोव्हेंबर रोजी रवाना झाली आहे, तर दुसरी तुकडी आज रवाना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत सलग तिसऱ्यांदा कांगारूंना पराभूत करून डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश करण्याकडे लक्ष देईल. त्याआधीच भारतीय संघाच्या कर्णधार पदावर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये असे सांगण्यात येत आहे रोहित शर्मा दुसऱ्या बाबा होणार आहे त्यामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये नसणार आहे. त्यामुळे कर्णधारपद हे जसप्रीत बुमराहकडे सोपवले जाणार असे म्हंटले जात आहे.

Web Title: Coach gautam gambhir gave a blunt answer to the trollers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 11:31 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Jasprit Bumrah
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
2

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
3

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
4

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.