CSK vs KKR: The 'Dhoni Review System' itself is in trouble, confusion over whether Thala is out or not, question marks over the umpires..
CSK vs KKR : आयपीएल 2025 च्या 25 व्या सामन्यात मोठी घडामोड बघायला मिळाली. चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट्स रायडर्स सामना रंगला होता. या सामन्यात केकेआरने सीएसकेचा दारुण पराभव केला. केकेआरकहा कर्णधार अजिंक्य रहाणेने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सीएसकेने प्रथम फलंदाजी करत20 षटकांत केवळ 103 धावाच केल्या. प्रतिउत्तरात केकेआरने हे लक्ष्य 11 ओव्हरमध्येच पूर्ण करून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग सीझनमधील पाचवा पराभव आहे. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सीएसकेच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. सीएसकेच्या डावादरम्यान एकं घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीची विकेट.
हेही वाचा : LSG vs GT : निकोलस पूरन-मोहम्मद सिराज यांच्यात रंगणार घमासान! आयपीएलमध्ये आज लखनौ-गुजरात आमनेसामने..
मोठया कालावधीनंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदासाठी मैदानावर उतरला. धोनी यावेळी देखील फलंदाजीने आपली कमाल दाखवू शकला नाही. तो एक केवळ एक धाव करत तंबूत परतला, मात्र त्याच्या बाद होण्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयपीएलमध्ये देखील वाईट पंचगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. यावेळी धोनीची विकेट त्याचे एक चांगले उदाहरण ठरले. धोनीला बाद घोषित केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. कारण अनेक लोकांना असे वाटत आहे की, तो बाद झाला नव्हता तरी देखील त्याला बाद ठरवण्यात आले.
१६ व्या षटकात सुनील नरीन गोलंदाजीसाठी आला. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर सुनील नरेनने धोनीला एलबीडब्ल्यू पकडले. त्यानंतर धोनीने रिव्ह्यू घेतला, कारण त्याला वाटले की चेंडू बॅटची कल घेऊन गेला आहे. त्यानंतर, जेव्हा रिव्ह्यूमध्ये स्निको मीटर आला, तेव्हा चेंडू बॅटजवळून गेल्यावर खूपच हलकीशी हालचाल दिसून आली होती. पण तरी देखील तिसऱ्या पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि धोनीला बाद दिले.
साधारणपणे असे लक्षात यीत की, धोनीला जेव्हा मैदानावरील पंचांचा निर्णय चुकीचा आहे याची खात्री पटते तेव्हाच तो रिव्ह्यूचोइ मागणी करतो. म्हणूनच समालोचक डीआरएसला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ म्हणत असतात. या सामन्यात मात्र असे काही दिसून आले नाही.
केकेआरविरुद्ध धोनी काही खास कमाल करू शकला नाही. तो ४ चेंडूत १ धावा काढून माघारी गेला. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले होते. चेन्नई सुपरकिंग्जचे सात फलंदाज १० धावांचा आकडा देखील गाठू शकले नाहीत. परिणामी चेन्नईला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ फक्त १०३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
Ms Dhoni was Clear Not Out
There were spikes when this worst umpiring declared Thala out pic.twitter.com/uncbCppQ69
— Mr. Villaaww’ (@OkayAchaa) April 11, 2025
रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आर अश्विन, नूर अहमद, अंशुल कम्बोज, खलील अहमद.
क्विंटन डी क्वाक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, हर्षित राणा, वरुण चक्रवती