भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार एम. एस. धोनी (M.S.Dhoni) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये माही (Mahi) चक्क हुक्का पिताना दिसत आहे. तोंडातून धूर सोडत पार्टीमध्ये हुक्का (Dhoni Smoking Hookah) घेत असलेला व्हिडिओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी (Dhoni Viral Video) यावर उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
महेंद्रसिंग धोनी हा सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, त्याचा पार्टीमध्ये हुक्का पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने फॉर्मल सूट परिधान केला असून लांब केस स्टाईल केले आहेत. या व्हिडिओमुळे नेटकरी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.
Herbal shisha hay! It’s good for health and contains no tobacco ??
Stop trolling MS Dhoni! He’s a legend. Rival fans should stay away from Mahi ❌ pic.twitter.com/F1SjaEY7ya
— Farid Khan (@_FaridKhan) January 6, 2024
महेंद्रसिंग धोनी अर्थात माही हा याचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक तरुण त्याला आपला आदर्श मानत असतात. त्याच्या क्रिकेटचे आणि फिटनेसचे अनेक दिवाने आहेत. मात्र सध्या माहीचा हुक्का ओढतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे चाहत्यांचे डोळे फिरले आहेत. अनेकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत तर काहींना त्याला समर्थन देखील केले आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला स्वातंत्र असून तो आता निवृत्त झाला आहे अशी प्रतिक्रिया देत समर्थन केले आहे. तर काही चाहते या व्हिडिओमुळे नाराजी व्यक्त करत आहेत.
यापूर्वी देखील माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार जॉर्ज बेले याने एका मुलाखतीमध्ये एम एस धोनीच्या हुक्का पिण्याबद्दल वक्तव्य केले होते. धोनीला हुक्का ओढायला आवडतो. तो अनेकदा यासाठी आपल्या खोलीमध्ये तयारी करतो. यावेळी तो इतर खेळाडूंना देखील निमंत्रित करतो आणि यावेळी हलक्या फुलक्या गप्पा होतात असे देखील जॉर्ज बेले याने म्हटले होते.