Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs KKR : जाता जाता चेन्नईच्या ‘किंग्स’नी केली कोलकाताची वाट बिकट! अटीतटीच्या सामन्यात CSK कडून KKR चा पराभव.. 

आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या विजयामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता कठीण झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 08:01 AM
CSK vs KKR: Chennai's 'Kings' made Kolkata's journey difficult! KKR defeated by CSK in a close match..

CSK vs KKR: Chennai's 'Kings' made Kolkata's journey difficult! KKR defeated by CSK in a close match..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs KKR : इंडियन प्रीमियर लीग  २०२५ मध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळवण्यात आले आहेत. ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल(७ मे) खेळला गेला. सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर केकेआरने १८० धावा उभारल्या. चेन्नईच्या संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवत ही धावसंख्या गाठली. या पराभवामुळे कोलकाताचा आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफचा मार्गही कठीण होऊन बसलाया आहे. चेन्नईच्या या विजयाचा हीरो  डेवाल्ड ब्रेव्हिस ठरला आहे.  त्याने जलद गतीने अर्धशतक साकारत चेन्नईला लक्षपर्यंत पोहचवले आणि अखेर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या स्टाइलने १७ धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.

चेन्नईविरुद्ध १७९ धावांचा बचाव करण्यात कोलकाता यश आले नाही. युवा गोलंदाज वैभव अरोराने चेन्नईच्या तीन गोलंदाजांना माघारी पाठवले. परंतु, त्याला त्या बदल्यात भरपूर धावा मोजाव्या लागल्या. त्याने तीन षटकांत ४८ धावा दिल्या. याशिवाय हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या परंतु त्यांना अखेरपर्यंत चेन्नईला रोखता आले नाही.

हेही वाचा : Rohit Sharma Retire: हिटमॅनने टेस्ट क्रिकेटला कायमचा ठोकला राम राम, म्हणाला,” मी ODI फॉरमॅटमध्ये…

डेवाल्ड ब्रेव्हिसची स्फोटक खेळी

चेन्नईच्या या विजयात युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने चमकदार खेळी करत चेन्नईची लाज राखली. त्याने कोलकाताविरुद्ध २५ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. वैभव अरोराच्या एका षटकात त्याने तब्बल ३० धावा वसूल केल्या.  त्याच्या खेळीमुळे चेन्नईला १७९ धावांचा पाठलाग करण्यात खूप सोपे गेले.  याशिवाय उर्विल पटेलने ११ चेंडूत २८१ च्या स्ट्राईक रेटने ३१ धावांची धामकेदार खेळी केली. तसेच शिवम दुबेने देखील महत्वपूर्ण ४५ धावा केल्या. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावा करून नाबाद राहिला आणि त्याने संघाला विजयी केले.

कोलकात्याचा डाव

चेन्नईविरुद्ध कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३३ चेंडचा सामना केला, यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय आंद्रे रसेलने ३८ धावा,  मनीष पांडे ३६ धावा यांनी देखील योगदान दिले.  तसेच सुरुवातीला सलामीवीर सुनील नारायणने २६ धावा केल्या. दुसरीकडे, तरुण फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग सामन्यात छाप पाडण्यात अपयशी ठरले.

हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानची जीभ घसरली! ‘Operation Sindoor’ नंतर Narendra Modi Stadium बॉम्बने उडवून देण्याची धमकी..

गोलंदाजीत, चेन्नईकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने शानदार कामगिरी करत चार षटकांत ७.८० च्या इकॉनॉमीसह ३१ धावा देत ४ विकेट्स मिळवल्या. याशिवाय अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Web Title: Csk vs kkr kkr defeated by csk in a close match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • CSK vs KKR
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
4

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.