नरेंद्र मोदी स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
Operation Sindoor : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढताना दिसत आहे. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केला. यामध्ये २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. यानंतर भारतात पाकिस्तानविरुद्ध तणाव वाढत गेला. भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर, ७ मे च्या रात्री, भारताने या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबावत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला केला. भारताच्या या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना जीवित तसेच वित्तहानी देखील झाली.
या घटनेनंतर आता पाकिस्तान आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यातूनछ पाकिस्तानची जीभ घरसली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. हा मेल ‘पाकिस्तान’ नावाच्या आयडीवरून करण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत ईमेलवर एक धमकीचा मेल करण्यात आला आहे. या धमकीनंतर आता भारतीय सुरक्षा संस्था चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.
भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता सुरक्षा संस्थांनी या धोक्याचे गांभीर्य तपसण्यास सुरवात केली आहेत. याशिवाय, येत्या आठवड्यात आयपीएल २०२५ दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात पोलिस आणि सायबर क्राईम टीमकडून या धमकीच्या मेलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मेल ट्रेस करण्यात येत आहे. त्यानंतर ते कुठून आले आणि कोणी पाठवले हे समजण्यास मदत होईल.
हेही वाचा : Rohit Sharma Retire: हिटमॅनने टेस्ट क्रिकेटला कायमचा ठोकला राम राम, म्हणाला,” मी ODI फॉरमॅटमध्ये…
आयपीएल २०२५ चे आगामी दोन सामने १४ आणि १८ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान, पहिला सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला होईल. जर या स्टेडियममधील प्रेक्षकांच्या बसण्याच्या क्षमतेबद्दल सांगायचे झाले तर, ती सुमारे १ लाख ३२ हजार आहे.