Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs PBKS : एकदा नाही, तर तब्बल तीन वेळा हवेत मारली उडी! सीमारेषेवर Dewald Brewis चा खळबळ उडवणारा झेल, पहा व्हिडिओ.. 

काल झालेल्या आयपीएल २०२५ मधील ४९ व्या सामन्यात   चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्ज संघाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात चेन्नईचा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसने अफलातून झेल पकडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 01, 2025 | 09:43 AM
CSK vs PBKS: Not once, but three times in the air! Dewald Brewis' sensational catch on the boundary, watch the video..

CSK vs PBKS: Not once, but three times in the air! Dewald Brewis' sensational catch on the boundary, watch the video..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs PBKS  : काल झालेल्या आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामना  चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केला. या परभवासोबतच चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरेलल्या चेन्नईने सॅम करनच्या ८८ धावांच्या जोरावर १९० धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात पंजाबने प्रभसीमरन आणि अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पूर्ण करून दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात चेन्नईच्या डेवाल्ड ब्रेव्हिस चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने टिपलेला अफलातून झेल सर्वांच्याच लक्षात राहीला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो उडी मारताना दिसून येत आहे.

आयपीएलच्या १८ व्या हंगामात आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक झेल बघायला मिळाले आहेत. अनेक झेल इतके कठीण होते की ते पकडणे अशक्य वाटत  असताना खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत ते टिपले. बुधवारी चेन्नई आणि पंजाबच्या सामन्यात असाच एक झेल पाहायला मिळाला, जिथे बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा  डेव्होल्ड ब्रेव्हिसने हवेत उडून एक अद्भुत असा झेल घेतला.

हेही वाचा : CSK vs PBKS : Yuzvendra Chahal ने घातला राडा! CSK कॅम्प केला उधवस्त, IPL 2025 मध्ये घेतली पहिली हॅटट्रिक, पहा VIDEO

नेमकं काय घडलं?

१८ व्या षटकात रवींद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या तिसऱ्या चेंडूवर, शशांक सिंगने मिड-विकेटच्या दिशेने हवेत स्वीप शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला उजवीकडे धावावे लागले, त्याने चेंडूसाठी हात पुढे केला आणि तो पकडला, पण त्याचा तोल गेला आणि चेंडू सीमारेषेवरून जाऊ लागल्याचे लक्षात आले. तो बाहेर गेला, पण त्याने चेंडू हवेत फेकून दिला. त्यानंतर बेबी एबीने पुन्हा हवेत  उडी मारली, पण तरीही तो बाहेर येऊ शकला नाही, म्हणून त्याने पुन्हा चेंडू हवेत फेकला, पण त्याची नजर चेंडूवरून सरकली नाही.  शेवटी झेल घेण्यासाठी त्याला ३ वेळा सीमा ओलांडून उडी मारावी लागली होती. या विकेटपूर्वी शशांक सिंगने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. इतके करून सुद्धा चेन्नई सुपर किंग्जला सामना राखता आला नाही आणि पंजाबने २ चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्य पूर्ण केले आणि ४ विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला.

हेही वाचा : CSK vs PBKS : पंजाबच ठरले ‘किंग्स’! चेन्नईची हाराकिरी सुरूच, घरच्या मैदानावरच CSK च्या वाट्याला आव्हान समाप्तीचा क्षण..

WHAT. A. CATCH 🔥

An absolute stunner from Dewald Brevis at the boundary😍

Excellent awareness from him 🫡

Updates ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS | @ChennaiIPL pic.twitter.com/CjZgjdEvUQ

— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025

चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात..

सीएसकेने प्रथम फलंदाजी करत १९० धावा केल्या होत्या, असे वाटत होते की चेन्नई सहज २०० च्यावर धावा करेल. परंतु, जर युजवेंद्र चहलने १९ व्या षटकात हॅट्रिक घेतली आणि चेन्नईचे मनसुबे उधवस्त झाले. या षटकात चहलने दुसऱ्याच चेंडूवर एमएस धोनीला बाद केले. यानंतर, त्याने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमदला बाद करून आयपीएल २०२५ मधील पहिली हॅटट्रिक घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. तर कर्णधार  श्रेयस अय्यरने  ४१ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. या विजयासह, पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.

Web Title: Csk vs pbks dewald brewis sensational catch on the boundary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2025

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.