सीएसके आणि पीबीएसके(फोटो-सोशल मिडिया)
CSK vs PBKS : इंडियन प्रीमियर लीगचा ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये रंगला. सीएसकेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. तरीही चेन्नईची फलंदाजांनी हाराकिरी केली. सॅम करन आणि डिवाल्ड ब्रेव्हीस वगळता एकाही फलंदाजाने जिगर दाखवली नाही. युझवेंद्र चहलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या चेन्नईचा संघ पुन्हा एकदा चेपॉकच्या स्टेडियमवर ऑलआउट झाला. चेन्नईच्या संघाने १० गडी गमावत १९० धावा केल्या. पण, पंजाबने ४ गड्यांच्या मोबदल्यात विसाव्या षटकात विजय मिळवत चेन्नईला घरच्या मैदानात स्पर्धेबाहेर केले. या पराभवासह चेन्नईचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला पहिला धक्का तिसऱ्या षटकातच बसला.
अर्शदीपने शेख रशीदला बाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. रशीदला फक्त ११ धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच षटकात आयुष म्हात्रेनेही आपली विकेट गमावली. आयुषही अवघ्या ७ धावांमध्ये बाद झाला. यानंतर मैदानात उतरलेला जडेजा चांगली फलंदाजी करताना दिसला. पण तोही सहाव्या षटकात बाद झाला. नारने जडेजाला १७ धावांवर बाद केले. त्यानंतर सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी चांगली भागीदारी केली. पण, पंजाबचे गोलंदाज ही पार्टनरशीप तोडण्यास यशस्वी ठरले. ब्रेविस आणि सॅम करन यांच्यात ७८ धावांची पार्टनरशीप झाली. ब्रेविस बाद झाल्यानंतरही सॅम करनने फटकेबाजी चालूच ठेवली. त्याने ३० चेंडूत अर्धशतक केले.
वैयक्तिक ५० धावा होताच सॅन करनने आपल्या खेळाला अजून धार दिली आणि पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, त्यानंतर चेन्नईचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. त्यामुळे चेन्नईला चांगल्या भागिदारीनंतरही १९० धावाच करता आल्या. त्यानंतर फलंदजीला आलेल्या पंजाबची सुरूवातही अडखळत झाली, पण श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत पंजाबचा विजय सोपा केला. यंदाची पहिली हॅटट्रिक चहलच्या नावे पंजाब किंग्जचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हॅटट्रिक घेणारा चहल पहिला गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : DC vs KKR : केकेआरच्या Sunil Narine ची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘या’ विश्वविक्रमाची केली बरोबरी..
चहलने १९ व्या षटकाचा पहिला चेंडू वाईड टाकला. त्यामुळे चहलला पुन्हा बॉल टाकावा लागला. धोनीने या बॉलवर षटकार लगावला. त्यानंतर चहलने दुसऱ्या बॉलवर धोनीला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चहलच्या तिसऱ्या बॉलवर दीपक हुड्डाने २ धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर हुड्डाला प्रियांशा आर्या याच्या हाती कॅच आऊट केले. पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोजला क्लीन बोल्ड केले. चहल हॅटट्रिक बॉलवर होता. चहलने नूरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. आणि नूरला मार्को यान्सेन याच्या हाती झेलबाद केले आणि हॅटट्रिक पूर्ण केली.