CSK vs PBKS: Yuzvendra Chahal created a ruckus! CSK camp destroyed, took first hat-trick in IPL 2025, watch VIDEO
CSK vs PBKS : आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात पंजाबने बाजी मारली आणि चेन्नईचा पराभव केला. या परभवासोबतच चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सॅम करनच्या ८८ धावांच्या जोरावर किंग्जसमोर १९० धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु, पंजाबने प्रभसीमरन आणि अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. या सामन्यात मोठी घडामोड घडली ती म्हणजे युजवेंद्र चहलने सीएसकेविरुद्ध घातक गोलंदाजी करत चेन्नईच्या डावाच्या १९व्या षटकात त्याने चार विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने त्याच षटकात आयपीएल २०२५ ची पहिली हॅटट्रिक देखील घेऊन दाखवली.
एक वेळ असे वाटत होते की, चेन्नई सुपर किंग्ज संघ सहजपणे २०० च्या वर धावा करण्यात यशस्वी होईल..पण, तसे काही एक झाले नाही. यामागील कारण म्हणजे १९ व्या षटकात युजवेंद्र चहलने केलेली शानदार गोलंदाजी. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात युजवेंद्र चहलने आयपीएल २०२५ मधील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवलाहे आहे. या षटकात चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज चहलच्या गोलंदाजीसमोर तुटून पडले होते. परंतु, त्यानेही जोरदार पलटवार करत चार विकेट्स घेतल्या.
𝙒.𝙒.𝙒 🤯
First hat-trick of the season 😍
Second hat-trick of his IPL career 🫡Yuzvendra Chahal is his name 😎
Updates ▶ https://t.co/eXWTTv8v6L #TATAIPL | #CSKvPBKS | @yuzi_chahal pic.twitter.com/4xyaX3pJLX
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
पंजाब किंग्जकडून युजवेंद्र चहल १९ वे षटक टाकण्यासाठी पुढे आला. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चहलने पुनरागमन करत धोनीला आपली शिकार बनवले. यानंतर, या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडा देखील बाद झाला. नंतर, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर, त्याने अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांचे बळी टिपले. अशाप्रकारे युजवेंद्र चहलने आयपीएल २०२५ ची पहिली हॅटट्रिक घेतली आहे.
या हॅटट्रिकसह चहल पंजाबकडून हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ४ विकेट्स घेणारा गोलंदाज देखील बनला आहे. या बाबतीत त्याने सुनील नरेनला मागे सोडले आहे. चहलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी सुनील नरेनकडून ८ वेळा चार विकेट घेण्यात आल्या होत्या.