CSK vs SRH: Chennai Super Kings and Sunrisers Hyderabad battle for survival, know the weather, probable playing 11.
CSK vs SRH : आयपीएलचा ४३ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यामुळे पॉइंट टेबलमध्ये फारसा फरक पडणार नसून विजयाने प्लेऑफमध्ये पात्र होण्याची आशा मात्र जिवंत ठेवता येईल. या हंगामात सनरायझर्स हैदराबादला ८ पैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जची देखील अशीच अवस्था आहे. चेन्नई ८ पैकी २ सामनेच जिंकू शकली आहे. पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ ९ व्या स्थानावर आहे आणि चेन्नई संघ १० व्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : ‘त्याच्याकडे विचार करण्यासाठी…’, Rishabh Pant च्या IPL मधील फॉर्मवर Cheteshwar Pujara चे खळबळजनक विधान..
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी संतुलित असून जिथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही समान संधी असल्याचे बोलले जात आहे. दव हा महत्वाचा घटक लक्षात घेता, लक्ष्याचा पाठलाग करणे अधिक चांगले होणार आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू सामन्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात.
हवामान अंदाजानुसार, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ रोजी चेन्नईचे तापमान दिवसा सुमारे ३९° सेल्सिअस आणि रात्री सुमारे २७° सेल्सिअस राहण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. आर्द्रता सुमारे ८०% असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्द्रता जाणवनार आहे. पावसाची शक्यता नसून हवामान स्वच्छ राहणार आहे. खेळाडूंना आर्द्रता आणि उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात २१ सामने खेळले गेले. चेन्नई सुपर किंग्जने १५ सामने जिंकले. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादने ६ सामने जिंकले. या हंगामात दोन्ही संघांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.
हेही वाचा : IPL 2025 : मिस्टर 360 की Nicholas Pooran, कोण फलंदाज उत्तम? टी-२० आणि IPL च्या आकडेवारीने दिले ‘हे’ उत्तर..
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र/वंश बेदी, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर/सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, इशान मलिंगा.