चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : देशात आयपीएल २०२५ चा थरार सुरू आहे. प्रत्येक संघ प्लेऑफ फेरीत जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत ४२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतची चर्चा सुरू झाली आहे. एलएसजी आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या सर्वात महागड्या कर्णधारासोबत खेळत आहे. कर्णधार ऋषभ पंतला २७ कोटींच्या किमतीत खरेदी करण्यात आले आहे. परंतु हा तडाखेबाज फलंदाज १८ व्या हंगामात पूर्णपणे शांत दिसून येत आहे. त्याच्या बॅटमधून धावाच येणे बंद झाले आहे. त्याच्या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या संघावरही झालेला दिसून येत आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या खराब फॉर्मबद्दल अनेक जण टीका करत आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : मिस्टर 360 की Nicholas Pooran, कोण फलंदाज उत्तम? टी-२० आणि IPL च्या आकडेवारीने दिले ‘हे’ उत्तर..
आयपीएल २०२५ मध्ये ऋषभ पंतची बॅट तळपताना दिसत नाहीये. त्यामुळे चाहते नाराज आहेत. दरम्यान, भारताचा अनुभवी कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने पंतच्या खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. त्याने ऋषभ पंतच्या खराब फॉर्ममागील कारण देखील सांगितले आहे. पुजारा नेमकं काय बोलला ते आपण जाणून घेऊया.
ऋषभ पंतच्या खराब फॉर्मबद्दल बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला आहे की, ‘जेव्हा पंत कसोटी सामने खेळतो तेव्हा त्याच्याकडे विचार करण्यासाठी आणि खेळण्यासाठी अतिरिक्त वेळ असतो. त्याला चांगले माहित आहे की गोलंदाज त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी क्षेत्ररक्षण आक्रमक असते, स्लिपमध्ये देखील खेळाडू असतात, ज्यामुळे त्याला खेळण्यासाठी अधिक गॅप मिळतो. परंतु टी-२० मध्ये गोष्टी खूप वेगवान असतात, ज्यामुळे पंतसाठी गोष्टी कठीण होऊ शकतात.’
आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना, ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. ऋषभ पंतने ९ सामन्यांपैकी ८ वेळा फलंदाजीसाठी मैदानात आल आहे. या आठ डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त १०६ धावाच निघू शकल्या आहेत. त्याच वेळी, सरासरी १३.२५ आणि स्ट्राइक रेट केवळ ९६.३६ आहे. या काळात, त्याची सर्वोच्च धावसंख्या ६३ धावा राहिली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही खेळी केली होती.
काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.