Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री; नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल

David Warner in Nepal Premier League for Kathmandu Gorkhas: डेव्हिड वॉर्नर लवकरच नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने काठमांडू गोरखा संघासोबत करार केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 05:21 PM
David Warner in Nepal Premier League f

David Warner in Nepal Premier League f

Follow Us
Follow Us:
  • नेपाळ क्रिकेट लीगसाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज
  • काठमांडू गोर्खाजसोबत करार
  • नेपाळ क्रिकेट लीगला मिळणार स्टार पॉवर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर नेपाळ आता प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे . त्याने काठमांडू गोरखा संघासोबत करार केला असून, या लीगमध्ये खेळण्याबद्दल त्याने आपला उत्साह व्यक्त केला आहे. नेपाळ प्रीमियर लीग (NPL) २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) काठमांडू गोरखाझ फ्रँचायझीने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करून वॉर्नरच्या संघात समावेशाची पुष्टी केली. वॉर्नरने ऑस्ट्रेलिया संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत लक्षणीय धावा केल्या आहेत. आता, वॉर्नर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

फ्रँचायझीने केली घोषणा

काठमांडू गोरखा संघाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओद्वारे डेव्हिड वॉर्नरच्या सहभागाची घोषणा केली. वॉर्नरने व्हिडिओमध्ये आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, ‘नमस्कार सर्वांना, नेपाळमध्ये येऊन काठमांडू गोरखा संघात सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मला माहित आहे की हा काळ अनेक लोकांसाठी खूप कठीण होता, आणि मला आशा आहे की एनपीएल (NPL) थोडा आनंद घेऊन येईल आणि लोकांना एकत्र येण्याची संधी देईल. मी येथील उत्साह आणि चाहत्यांबद्दल खूप ऐकले आहे. हे सर्व अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे. मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आणि माझ्या संघासोबत मैदानावर खेळण्यासाठी खूप आतुर आहे.’

काठमांडू गोरखाजचे कार्यकारी संचालक अनुभव स्वर सिरोहिया यांनीही वॉर्नरसोबतच्या कराराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, वॉर्नरचे संघात आगमन एका रात्रीत झालेले नाही. यासाठी अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. डेव्हिड वॉर्नरसारख्या विश्वविजेत्याला नेपाळमध्ये आणणे ही येथील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा असेल. त्याच्या आगमनामुळे नेपाळी क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल. चाहत्यांसाठीही ही एक मोठी संधी आहे.

12th Warriors, you manifested this! Two-time ICC Men’s Cricket World Cup champion.
T20 World Cup champion and Player of the Tournament.
World Test Championship winner.
Triple centurion.
And the only player to win three IPL Orange Caps.
🔥 One of world cricket’s most… pic.twitter.com/zxTMyD2On2 — Kathmandu Gorkhas (@ktm_gorkhas) September 15, 2026

वॉर्नरची शानदार कारकीर्द

३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. त्याने आपला शेवटचा सामना २०२४ मध्ये खेळला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ११२ कसोटी सामन्यांमध्ये ८,७८६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, वॉर्नरने १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६,९३२ धावा केल्या आहेत. त्याने ११० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,२७७ धावा देखील केल्या आहेत. त्याने कसोटीत २६ शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ शतके आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक झळकावले आहे. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी २०२१ चा टी-२० विश्वचषकही जिंकला. तसेच त्याने ऑस्ट्रेलियासाठी २०२१-२३ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही जिंकला.

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Web Title: David warner nepal premier league kathmandu gorkhas deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • David Warner

संबंधित बातम्या

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी
1

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.