Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs RCB, WPL 2026 : आज दिल्लीसाठी ‘जिंका किंवा मरा’! TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय;RCB करणार फलंदाजी 

आज महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने आहेत. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 07:46 PM
DC vs RCB, WPL 2026: It's a 'win or die' situation for Delhi today! They won the toss and elected to bowl; RCB will bat.

DC vs RCB, WPL 2026: It's a 'win or die' situation for Delhi today! They won the toss and elected to bowl; RCB will bat.

Follow Us
Close
Follow Us:

DC vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला करा किंवा मरा अशी परिस्थिति आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त २ समानेच जिंकता आले आहेत. तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर स्मृती मांनधनाचा आरसीबी संघ चालू हंगामातील ५ पैकी ५ सामने जिंकून प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झाला आहे. त्यामुळे खरे आजच्या सामन्यात जेमिमा रोड्रिग्सच्या दिल्ली संघासमोर खरे आव्हान असणार आहे.

हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO

टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने सांगितले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. लाईट्सखाली चेंडू वेगाने येईल आणि दवही पडेल. खेळपट्टी थोडी ताजीतवानी दिसत आहे आणि चेंडू बॅटवर चांगला येत आहे असे वाटते, पण आम्ही जे पाहिले आणि वाचले आहे त्यानुसार, चेंडू थोडा खालीच राहील. त्यामुळे मला वाटत नाही की खेळण्याच्या योजनेत फारसा बदल होईल. आमच्या संघात दोन बदल आहेत – लुसी हॅमिल्टन खेळणार नाही आणि चिनले हेन्री संघात आली आहे, तसेच दीया जखमी आहे आणि मिनू मन्नी परत आली आहे.”

🚨 Toss 🚨@DelhiCapitals have won the toss against @RCBTweets and elected to bowl first in Match 1⃣5⃣ Updates ▶️ https://t.co/LX37VtsnbS#TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvDC pic.twitter.com/RicUI7NUqK — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 24, 2026

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाची कर्णधार स्मृती मानधनाने प्रतिक्रिया देताना म्हटले की,  “आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करत होतो. आम्ही आज त्याबद्दल विचार केला, खूप वारा आहे, त्यामुळे दव जास्त पडणार नाही. ही स्पर्धा अशी आहे की, जेव्हा जेव्हा आम्हाला क्षेत्ररक्षण करायचे होते, तेव्हा आम्हाला ती संधी मिळाली नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. आम्ही अजूनही छोट्या गोष्टी योग्य प्रकारे करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्या संघात एक बदल आहे – अरु फिट आहे आणि ती प्रेमाच्या जागी संघात आली आहे.”

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), नदिन डी क्लर्क, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल

दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, स्नेह राणा, चिनेल हेन्री, श्री चरणी, नंदनी शर्मा, मिन्नू मणी

Web Title: Dc vs rcb wpl 2026 delhi won the toss and elected to bowl rcb will bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • Jemimah Rodrigues
  • Smriti Mandhana
  • WPL 2026

संबंधित बातम्या

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान
1

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
2

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Palash Muchhal चे काळे कारस्थान उघड? बेडवर दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पकडल्याचा अभिनेता-निर्मात्याच्या धक्कादायक आरोप
3

Palash Muchhal चे काळे कारस्थान उघड? बेडवर दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पकडल्याचा अभिनेता-निर्मात्याच्या धक्कादायक आरोप

WPL 2026 Points Table : गुणतालिकेचे बदलले चित्र! गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉइंट्स टेबल हलले, मुंबई इंडियन्स टॉप-2 मधून बाहेर
4

WPL 2026 Points Table : गुणतालिकेचे बदलले चित्र! गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉइंट्स टेबल हलले, मुंबई इंडियन्स टॉप-2 मधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.