Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्या देशमुखकडून जागतिक नंबर-१ चायनीज खेळाडूचा पराभव; महाराष्ट्राच्या बुद्धिबळ स्टार लेकीचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन.. 

महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख या लेकीने जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत चीनची दिग्गज खेळाडू हौ यिफानला पराभूत केले आहे. दिव्याच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आनंद व्यक्त केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 19, 2025 | 09:12 PM
Divya Deshmukh defeats world number 1 Chinese player; PM Modi congratulates Maharashtra's chess star daughter.

Divya Deshmukh defeats world number 1 Chinese player; PM Modi congratulates Maharashtra's chess star daughter.

Follow Us
Close
Follow Us:

Divya Deshmukh congratulated by Prime Minister Modi : १९ जून रोजी सोशल मीडियावर दिव्या देशमुख खूप चर्चेत आली. यामागील कारण म्हणजे या महाराष्ट्राच्या लेकीने जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत चीनची दिग्गज खेळाडू हौ यिफानला पराभूत केले आहे. भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत तिने चीनची नंबर वन खेळाडू हौ यिफानला चारीमुंड्या चित केले आहे.

हेही वाचा : IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..

चीनच्या खेळाडूने उपांत्य फेरीत तिला पराभूत केले असले तरी, दुसऱ्या सामन्यात १९ वर्षीय दिव्याने शानदार पुनरागमन करून दाखवले आहे. या दरम्यान, पांढऱ्या तुकड्यांसह खेळत तिने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी खेळाडूवर आपला दबदबा कायम ठेवला. त्याच वेळी, तरुण भारतीय खेळाडूने ब्लिट्झ बुद्धिबळात वेळेचे योग्य व्यवस्थापन केले, याचमुळे ती चिनी दिग्गज खेळाडूला हरवण्यात यशस्वी ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन

दिव्याच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आनंद व्यक्त केला. त्यांनी दिव्याला तिच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, “लंडनमधील ब्लिट्झ वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमांक १ हौ यिफानला हरवल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. तिचे यश तिचे धाडस आणि दृढनिश्चय दर्शवते. हे अनेक येणाऱ्या बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देते. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.” असे मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : IND vs ENG: पहिल्या कसोटी पूर्वी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण; ‘या’ दोन दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो..

कोण आहे दिव्या देशमुख?

दिव्या देशमुख ही १९ वर्षांची प्रतिभावान बुद्धिबळपटू असून तिचा जन्म  ९ डिसेंबर २००५ रोजी महाराष्ट्रातील  नागपूर येथे झाला. तिचे पालक व्यवसायाने डॉक्टर आहेत. तिच्या आईचे नाव नम्रता आणि वडिलांचे नाव जितेंद्र आहे. भारताची स्टार बुद्धिबळपटू दिव्याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ हा खेळ खेळायला सुरुवात केली. तिने २०१२ मध्ये अंडर-७ राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले होते. त्यावेळी ती  केवळ सात वर्षांची होती. यानंतर, तीने मागे वळून पाहिले नाही. तीने अंडर-१० डर्बन-२०१४, अंडर-१२ ब्राझील प्रकारात जागतिक युवा विजेतेपद देखील जिंकले आहे.

Web Title: Divya deshmukh defeats world number 1 chinese player pm modi congratulates her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
1

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
2

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं
3

Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं

Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार
4

Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.